Bigg Boss Marathi ५: मी कोणाला सोडत नाय! कॅप्टन्सी टास्कमध्ये अरबाज- निक्कीशी भिडला सुरज; एकेकाला दाखवली त्यांची जागा

Bigg Boss Marathi Suraj Chavan Fight : 'बिग बॉस मराठी ५'मधील सुरज चव्हाण कॅप्टन्सी टास्कदरम्यान दमदार खेळताना दिसतोय. तो प्रत्येकाला नडताना दिसतोय.
bigg boss marathi 5
bigg boss marathi 5esakal
Updated on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' सध्या प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. या कार्यक्रमाने यापूर्वीच्या 'बिग बॉस मराठी सीझन्सचे सगळे टीआरपी रेकॉर्ड मोडलेत असं दिसतंय. ऑनलाइन टीआरपीमध्येही 'बिग बॉस मराठी ५'ने टॉप ५ मध्ये स्थान मिळवलं आहे. याला कारणीभूत ठरतोय तो घरातल्या सदस्यांचा खेळ. निकी, जान्हवी, अरबाज आणि वैभव यांच्या चौकडीने सगळ्यांवर भारी पडायचं ठरवलं असलं तरी आता त्यांच्या विरुद्ध सुरज चव्हाण उभा ठाकल्याचं दिसत आहे. या आठवड्याच्या कॅप्टन्सी टास्कमध्ये सुरज आज सगळ्यांवर भारी पडताना दिसणार आहे. त्याचं रौद्ररूप आज पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे.

यापूर्वी सगळेच सूरजला गेम कळाला नाहीये असं म्हणत होते. मात्र आता त्यालाही घरात दोन आठवडे झालेय. त्यात आता त्याला कॅप्टन्सी महत्वाची असते हे उमगलं आहे. त्यामुळे आता तो या आठवड्याच्या कॅप्टन्सी टास्कमध्ये जोर लावताना दिसत आहे. एकटा सुरज सगळ्यांशी भिडताना दिसत आहे. टीम बी चे सगळे सदस्य बाद झालेत आणि आता फक्त सुरज, निकी, जान्हवी, निखिल आणि अरबाज खेळताना दिसत आहेत. वैभव सूरजला तू हातपाय का मारतोय असं विचारतोय. त्यावर सुरज रागात वैभवला मी मला काय पाहिजे ते करेन असं म्हणतोय. तर तो एकटा अरबाजला नडताना दिसतोय. तो अरबाजला आवरला जात नाहीये.

टास्कमध्ये सुरज निखिल, अरबाजवर भारी पडला आहे. तो त्या दोघांनाही ओढत घेऊन जातोय. तो अगदी बिनधास्त स्टाइलने खेळताना दिसतोय तर इतर त्याला पाहून चकीत झाले आहेत. आता नेटकरीही त्याचा हा रांगडा अंदाज पाहून त्याचं कौतुक करत आहेत. असाच नड तू त्यांना अशाच भिडणाऱ्या व्यक्तीची गरज आहे त्याशिवाय ते सुधारणार नाहीत असं म्हणत चाहते सूरजला पाठिंबा दिला आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

bigg boss marathi 5
Suraj Chavan: गर्लफ्रेंड सोडून गेल्यावर अशी झालेली सूरज चव्हाणची अवस्था, म्हणतो- ती गेली तेव्हाच ठरवलं...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.