Bigg Boss Marathi 5 Elimination: या आठवड्यात कोण होणार घराबाहेर? चौघांपैकी या सदस्याला मिळालेत सगळ्यात कमी वोट

Bigg Boss Marathi 5 Voting Trends: 'बिग बॉस मराठी ५' च्या घरातून बाहेर जाण्यासाठी या आठवड्यात ४ सदस्य नॉमिनेट आहेत.
bigg boss marathi 5
bigg boss marathi 5esakal
Updated on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ''बिग बॉस मराठी ५'. या शोने सगळीकडे नुसता धुमाकूळ घातला आहे. यावेळेस घरात आलेले अतरंगी सदस्य आपल्या वागण्याने प्रेक्षकांची बोलणी ऐकतायत तर काही कौतुकाला पात्र ठरतायत. आता 'बिग बॉस मराठी ५' चा तिसरा आठवडा झाला आहे. मागील आठवड्यात घरात एलिमिनेशन झालं नव्हतं. मात्र या आठवड्यात घरातील एक सदस्य घराबाहेर होणार आहे. त्यात या आठवड्यात फक्त ४ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यातील सगळ्यात कमी वोट पडलेला सदस्य आज घराबाहेर जाणार आहे.

या आठवड्यात 'योगिता, निखिल, सुरज आणि अभिजित सावंत हे चार सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट आहेत. अरबाज आणि अभिजित यांना मिळालेल्या स्पेशल पॉवरमध्ये अरबाज घनश्याम याला वाचवून अभिजितला नॉमिनेट करतो. आता या चौघांपैकी सूरजला संपूर्ण महाराष्ट्राचा मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे त्याचे वोट्स खूप जास्त आहेत. तो यावेळेसही सेफ आहे. तर त्यापाठोपाठ अभिजितच गेम दिसल्याने चाहते त्यालाही वोट करत आहेत. या आठवड्यात सुरज आणि अभिजित यांना सगळ्यात जास्त वोटिंग झाली आहे. मात्र योगिता आणि निखिल दोघेही बॉटम २ मध्ये आहेत. यापूर्वी निखिलला रितेशने डबल ढोलकी म्हटलं होतं तर योगिताने स्वतःचं घराबाहेर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती.

मात्र या आठवड्यात योगिताने जान्हवी आणि निकी यांच्या नाकात दम आणला. ती एकटी त्या दोघांवरही भारी पडली होती. आता या दोघांपैकी योगिताचे वोट जास्त आहेत. मात्र निखिलचा गेम खराब असल्याने तो लवकरच घराबाहेर जाऊ शकतो असं दिसतंय. सध्याच्या वोटिंगनुसार निखिल सगळ्यात खाली आहे. त्यामुळे आता योगिता आणि निखिल यापैकी नेमकं कोण जाणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

bigg boss marathi 5
Subodh Bhave: तर तुमचाच कडेलोट केला असता... 'हर हर महादेव'च्या ट्रोलर्सना सुबोध भावेने सुनावलं; म्हणाला- छत्रपतींची भूमिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.