'बिग बॉस मराठी ५'च्या विजेत्याची झाली दिलाच्या राणीशी भेट; गौतमीला सुरज चव्हाणसोबत पाहून नेटकरी जोशात, व्हिडिओ व्हायरल

Suraj Chavan Meets Gautami Patil Video Viral: लोकप्रिय रीलस्टार सुरज चव्हाण याची नुकतीच लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यासोबत भेट झाली. त्यांचा एक व्हिडिओ आता व्हायरल होतोय.
suraj chavan and gautami patil
suraj chavan and gautami patil
Updated on

सगळ्या महाराष्ट्राच्या गळ्यातला ताईत असलेला लोकप्रिय रीलस्टार आणि 'बिग बॉस मराठी ५' चा महाविजेता सुरज चव्हाण याची क्रेझ काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. तो जिथे जिथे जातो तिथे चाहते त्याला पाहण्यासाठी गर्दी करतात. त्याने आपल्या साधेपणाने संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकली आहेत. आता सुरजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात तो चक्क सबसे कातिल गौतमी पाटील हिला भेटला आहे. स्वतः गौतमी पाटील हिने त्यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. जो पाहून आता चाहतेही त्यांच्या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट करत आहेत.

बिग बॉस मराठी जिंकल्यानंतर सुरज सध्या अनेक ठिकाणी कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. अशीच त्याने नवरात्रीत एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमादरम्यान त्याची भेट गौतमी पाटील हिच्यासोबत झाली. त्यांचा व्हिडिओ गौतमीने शेअर केला आहे. या व्हिडिओत गौतमी सुरजसोबत गप्पा मारताना दिसतेय. ती त्याच्यासोबत हसत गप्पा मारतेय तर सुरज नेहमीप्रमाणे शांत तिच्या समोर ईभा राहून हाताची घडी घालून तिच्या प्रश्नांना उत्तरं देताना दिसतोय. मात्र त्यांना एकत्र पाहून त्यांच्या शेजारचे चांगलेच खूप आलेत. ते कौतुकाने त्यांना बोलताना पाहत आहेत. तर नेटकरीही त्या दोघांचा व्हिडिओ पाहून आनंदी झाले आहेत. आणि सोबतच सुरजच्या साधेपणाचं कौतुक करत आहेत.

सुरज आणि गौतमीची ही भेट चांगलीच गाजणार हे मात्र नक्की. दुसरीकडे सूरजचा 'राजा राणी' हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. त्यात तो सहाय्यक कलाकाराच्या भूमिकेत आहे. तर केदार शिंदेंसोबत तो एका नव्या चित्रपटातही झळकणार आहे त्याचं नावही 'झापूकझुपक' आहे. सुरजने बिग बॉस मराठी ५ जिंकल्यानंतर त्याच्या गावी त्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं होतं.

suraj chavan and gautami patil
एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.