नायिका की खलनायिका? झी वरील नव्या मालिकेत वीणा जगतापचा हटके अंदाज; 'मुरांबा' फेम अभिनेत्रीही झळकणार

Zee Marathi New Serial Savlyachi Janu Savali Starcast: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री वीणा जगताप पुन्हा एकदा मराठी मालिकेत एंट्री करणार आहे.
savlyachi janu savali
savlyachi janu savaliesakal
Updated on

Veena Jagtap in a new serial on Zee: छोट्या पडद्यावर सध्या अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यात कलर्स मराठी सध्या आपलं रुपडं बदलताना दिसतंय. कलर्स मराठीवर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्या पाठोपाठ झी मराठीवरही काही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. महिन्याभरापूर्वी झी मराठीवरील एका नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता. झी वाहिनीवर 'सावळ्याची जणू सावली' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या मालिकेच्या नव्या प्रोमोची सोशल मीडियावर चर्चा आहे. या व्हिडिओमध्ये मालिकेची स्टारकास्ट समोर आली आहे.

या मालिकेमध्ये अभिनेत्री प्राप्ती रेडकर मुख्य भूमिकेत दिसत आहे. तर नव्या प्रोमोमध्ये इतर कलाकार देखील दिसत आहे. या मालिकेत अभिनेत्री वीणा जगताप दिसत आहे. वीणा यापूर्वी 'रमा राघव' आणि 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत दिसली होती. मात्र या मालिकांमध्ये तिचा कॅमिओ होता. आता ती पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. तर तिच्यासोबत या मालिकेत मुरांबा फेम अभिनेत्री सुलेखा तळवलकर दिसणार आहेत. सुलेखा मालिकेत मुख्य खलनायिकेच्या भूमिकेत आहेत. त्या पूर्वी 'मुरांबा' मालिकेत अक्षयच्या आईच्या आणि प्रेमळ सासूच्या भूमिकेत दिसल्या होत्या.

त्यांच्यासोबतच 'रात्रीस खेळ चाले' मधील अभिनेता साईंकित कामत मुख्य भूमिकेत दिसत आहे. साईंकित हा 'रात्रीस खेळ चाले' मालिकेत जयरामच्या भूमिकेत दिसला होता. आता तो या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. या मालिकेची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. मात्र ही मालिका कधीपासून दुरु होणार याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

savlyachi janu savali
कोण आहेत मराठी दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे ज्यांच्या घरात झाली फिल्मी स्टाइल चोरी, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.