छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरलाय. हा कार्यक्रम सुरू होऊन आता ३० दिवस उलटून गेले आहेत. यावेळेस प्रेक्षकांना काही ओळखीचे तर काही अनोळखी चेहरे पाहायला मिळत आहेत. घरातील ३ सदस्यांचं एव्हिक्शन झालं आहे. प्रेक्षक दर आठवड्याला भाऊच्या धक्क्याची वाट पाहत असतात. आता या आठवड्यातही भाऊच्या धक्क्यावर काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. त्याचं कारण म्हणजे या आठवड्यात बंद असलेल्या वोटिंग लाइन. सोबतच या वीकमध्ये एका वाइल्ड कार्ड सदस्यांची एंट्री होणार असल्याचं देखील बोललं जातंय.
या आठवड्यात म्हणावं तसं खास काहीही घडलं नसल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. हा आठवडा बोरिंग होता त्यामुळे टीआरपीवर त्याचा नक्कीच फरक पडणार आहे. त्यात संपूर्ण आठवडा बिग बॉसने निकी अभिजित आणि अरबाज यांच्या आवतीभवती घालवला आहे. निकी आणि अरबाज यांचं भांडण ते पुन्हा एकत्र येणं नेटकऱ्यांना खटकलं आहे. एकीकडे ते सगळ्यांसमोर भांडतात आणि एकटे असताना एकत्र येत एकमेकांना मिठी मारतात त्यामुळे ते घरातल्यांसोबत गेम खेळत आहेत असं सगळ्यांचं म्हणणं आहे. हा संपूर्ण आठवडा स्क्रीनवर फक्त निकीच दिसत होती. त्यामुळे बिग बॉसला निकीला जिंकवायचं आहे का असा प्रश्न आता विचारण्यात येतोय.
दुसरीकडे टास्कदरम्यान फक्त अंकिताने घनश्यामला ओढलं हे दाखवण्यात आलं. मात्र सुरुवात घनश्यामने केली होती. ती फक्त त्याला रोखत होती. नेटकऱ्यांच्या मते तिने कोणताही नियम तोडलेला नाही. तरीही जर अंकिताला ओरडा पडला तर बिग बॉस निकीला वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत हे सिद्ध होईल. यापूर्वी निकीने अनेकांना धक्का दिला, अनेक नियम तोडले तरीही तिला कधीही काही बोलण्यात आलं नाही. त्यामुळे आता एका गोष्टीवरून अंकिताला सुनावण्यात आलं तर बिग बॉस पूर्ण निकीला सपोर्ट करत आहे हे सिद्ध होईल.
इतकंच नाही तर प्रेक्षक निकी, अरबाज विरुद्ध बोलत असताना निकीचे पीआर आता सोशल मीडियावर सक्रीय झाले आहेत. ते निकी आणि अभिजित विषयी चांगल्या आणि आर्या विषयी वाईट कमेंट करत आहेत. प्रत्येक पोस्टवर निकीच्या पीआर अकाउंटच्या पोस्ट असल्याने आता ही गोष्ट प्रेक्षकांच्याही लक्षात येऊ लागली आहे.
या आठवड्यात खरच कुणी वाइल्ड कार्ड येणार आहे का अशी विचारणा प्रेक्षकांकडून करण्यात येत आहे. कारण आता गेम सुरू होऊन एक महिना उलटला आहे. त्यामुळे या आठवड्याच्या वोटिंग लाइन बंद असल्याने वाइल्ड कार्ड एंट्री होण्याची दाट शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.