Jahnavi Killekar: पैसा पाहून भुलली असं... दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना जान्हवीच्या नवऱ्याचं सडेतोड उत्तर, म्हणाला

Jahnavi Killekar Husband Kiran Killekar Slammed Trollers: अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिच्या पतीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याला दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं आहे.
jahnavi killekar kiran killekar
jahnavi killekar kiran killekar esakal
Updated on

'बिग बॉस मराठी ५' च्या घरात धुमाकूळ घालणाऱ्या जान्हवी किल्लेकर कायम प्रेक्षकांमध्ये चर्चेत असते. गेले चार आठवडे जान्हवीने तिच्या चुकीच्या वागण्यामुळे प्रेक्षकांची नाराजी ओढवून घेतली. मागील आठवड्यात मात्र जान्हवीने केलेल्या चांगल्या कामाचं रितेशने भाऊच्या धक्क्यावर कौतुक केलं. मात्र जान्हवीला सोशल मीडियावर होणारं ट्रोलिंग काही थांबायचं नाव घेत नाहीये. तिला तिच्या वागण्यावरून तर ट्रोल केलं जाताच सोबतच तिच्या घरातल्यांना देखील ट्रोल केलं जातंय. तिच्या पतीलादेखील अशा बऱ्याच कमेंटचा सामना करावा लागतोय. याबद्दल जान्हवीचा पती किरण किल्लेकर याने एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.

किरण यांनी नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना किरण म्हणाले, 'मी तिला सोशल मीडियावर फोटो टाकू देत नाही यामागेही कारण आहे, मला ते आवडत नाही कारण मला कळतं की तिने माझ्यासोबत फोटो टाकले की लोक तिला बोलणार. माझ्या दिसण्यावरून बोलणार. लोक दिसण्यावरून खूप जज करतात. मला तिला उगीच कुणी बोललेलं आवडत नाही. म्हणून मी तिला रोखतो. आताही तेच झालंय ना. आमचे फोटो व्हायरल आले. लोक मला काय काय बोलतायत. तिला खूप काही बोलतायत.'

ते पुढे म्हणाले, 'लोक मला दिसण्यावरून बोलतायत. माकड, इडलीवाला, गव्हर्नमेंट जॉब असेल त्याच्याकडे, खूप पैसेवाला असेल, डुक्कर पण बोलतायत. किती खालची पातळी ही . दिसण्यावरून फक्त जज करायचं आणि बोलायचं. तिने माझ्याशी पैशांसाठी लग्न केलं असं बोलतायत. मला त्यांना सांगायचंय. मी तुम्ही समजताय तसा श्रीमंत वगरे नाहीये. माझ्याकडे बंगलावगरे नाही. आमचा एक बिझनेस आहे आणि जेवढं आहे तेवढं खूप आहे. आम्ही समाधानी आहोत. माझे मित्र मला पोस्टवगरे पाठवतात आणि विचारतात तू कम्प्लेंट का नाही करत, मी म्हणतो कुणाकुणाची कम्प्लेंट करायची? करुदे त्यांना जे करायचं ते.'

ते पुढे म्हणाले, 'मी म्हणतो तुमचं मत आहे तुम्ही मांडा पण तुम्ही जे शब्द वापरताय ते चांगले वापरू शकता. एखाद्याला चांगल्या शब्दातही सांगता येतं की तू चुकतोयस. हे फक्त तीन महिने आहे. नंतर कोण किरण किल्लेकर? जान्हवी किल्लेकरला सगळ्यांनी बाद केलंय. तिने तिचं करिअर खराब केलंय असं लोक बोलतायत. ती दिसणार पण नाही. बघूया. पुढचं पुढे. मी तिला सांगेन की बाई तोंड सांभाळ. तू हुशार आहेस. बोलताना फक्त विचार करून बोल. बोलताना माणूस कोण आहे याचा विचार कर.'

jahnavi killekar kiran killekar
इतकं घाण बोलतायत की... जान्हवीचे ट्रोलर्स मुलावर काढतायत राग; अभिनेत्रीच्या पतीने जोडले हात, म्हणाले- त्याला ताप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.