छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी सीझन ५' दिवसेंदिवस आणखीनच आतुरता वाढवणारा ठरत आहे. घरात दररोज काहीतरी नवीन घडतं. निक्कीच्या चुका आणि भांडणं असोत किंवा घरातल्यांचे राडे यासगळ्यावर नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देताना दिसतात. भाऊच्या धक्क्यावर सगळ्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळते. या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर रितेशने निक्कीला शिक्षा सुनावली आणि तिची कॅप्टन्सी काढून घेतली. त्यासोबतच घनश्याम दरोडे या आठवड्यात घराबाहेर गेला. मात्र आता त्याच्याजागी दुसऱ्या व्यक्तीची 'बिग बॉसच्या घरात एंट्री झाली आहे.
घरात आता सहावा आठवडा सुरू आहे. या आठवड्यात सात जण घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेटेड होते. त्यातील घनश्याम दरोडे याने घराचा निरोप घेतला. आता त्याजागी दुसऱ्या व्यक्तीची घरात एंट्री झाली आहे. कलर्स मराठीने एक नवा प्रोमो प्रदर्शित केला आहे. यात घरात येणाऱ्या नव्या सदस्यांची जबरदस्त एंट्री दाखवण्यात आली आहे. घरात आणखी एक कोल्हापूरचा रांगडा गाडी येणार आहे. प्रोमोमध्ये त्याचा चेहरा दिसत नसला तरी नेटकऱ्यांनी त्याला ओळखलं आहे. नेटकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा व्यक्ती संग्राम चौगुले आहे.
संग्राम चौगुले हा कोल्हापूरचा लोकप्रिय बॉडीबिल्डर आहे. तो अतिशय फिटनेस फ्रिक आहे. त्याने २०१२ साली साली मिस्टर युनिव्हर्स हा 'किताब जिंकला होता. तर २०१४ साली तो मिस्टर वर्ल्ड बनला. त्याने अनेक पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. तो सध्या पुण्यात स्थायिक आहे. त्याने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केली आहे. आता संग्रामच्या घरात येण्याने आता घरातली समीकरणं बदलणार आहेत हे स्पष्ट आहे. तर दुसरीकडे चाहते त्याला निक्कीच्या नादाला लागू नकोस असा सल्ला देत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.