बिग बॉस फेम अरमान मलिकचा मोठा अपघात; थोडक्यात बचावला जीव, व्हिडिओ शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

Armaan Malik Car Accident: लोकप्रिय युट्यूबर अरमान मलिक याचा मोठा अपघात झाला आहे. गाडीचा टायर फुटल्याने त्याच्या गाडीला अपघात झाला आहे.
Armaan Malik
Armaan Malikesakal
Updated on

आपल्या दोन पत्नींसह 'बिग बॉस ओटीटी ३' च्या घरात एंट्री घेणारा लोकप्रिय युट्यूबर अरमान मलिक याचा मोठा अपघात झाला आहे. या गाडीत तो, त्याची पत्नी कृतिका आणि ड्रायव्हर होता. या अपघातातून ते तिघेही थोडक्यात बचावले आहेत. अरमान एक व्हिडिओ शूट करून मनालीहून परत येत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यांच्या मर्सिडीज गाडीचा टायर फुटल्याने त्यांची गाडी अनियंत्रित झाली. चालकाने कशीबशी परिस्थिती नियंत्रणात आणल्याने त्यांचा जीव वाचला. या घटनेनंतर अरमानने एक व्हिडिओ शेअर करत घडल्या प्रकरणाबद्दल संताप व्यक्त केला. सोबतच नेमकं काय घडलं याबद्दल सांगत ही गाडी न घेण्याचं आवाहन केलं.

नेमकं काय घडलं?

युट्यूबर अरमान मलिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अरमान म्हणतो, 'एक आठवड्यापूर्वी मी या कारची तक्रार केली होती. आज आमच्यासोबत दुर्घटना घडली. आज आम्ही शूटिंग करून मनालीहून परत येत होतो, तेव्हा गाडीचा पूर्ण टायर फुटला. आम्ही मृत्यूच्या जबड्यातून थोडक्यात बचावलो आहोत. मी कारमध्ये झोपलो होतो आणि योगेश गाडी चालवत होता. कृतिका मागच्या सीटवर बसली होती". यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आज आम्ही मरता-मरचा वाचलो आहोत.' यानंतर त्याने सगळ्यांना गाडीचं नाव सांगत ही गाडी न घेण्याबद्दल सांगितलं.

या भीषण अपघातात त्याला आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीव गमवावा लागला असता, मात्र ते थोडक्यात बचावले. अरमान मलिकचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अरमान हा अनेक गोष्टींसाठी सोशल मीडियावर चर्चेत असतो. त्याने आपल्या दोन्ही पत्नी पायल आणि कृतिकासोबत 'बिग बॉस ओतिती ३' च्या घरात प्रवेश केला होता. तेव्हापासून तो आणखीनच चर्चेत आला.

Armaan Malik
'बिग बॉस मराठी ५'च्या विजेत्याची झाली दिलाच्या राणीशी भेट; गौतमीला सुरज चव्हाणसोबत पाहून नेटकरी जोशात, व्हिडिओ व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.