स्टार प्लसची लोकप्रिय मालिका 'अनुपमा'च्या सेटवर एक मोठा अपघात झाला आहे. रुपाली गांगुलीच्या मालिकेच्या सेटवर एका कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू झालाय. टीव्ही ९ ने दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधील ही व्यक्ती स्टार प्लस शो 'अनुपमा'च्या सेटवर कॅमेरा असिस्टंट म्हणून काम करण्यासाठी आली होती. तेथे विजेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला. अनुपमा यांच्या टीमने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ही माहिती मिळाल्यानंतर टीव्ही ९च्या टीमने चॅनल आणि प्रोडक्शन या दोन्ही प्रवक्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र या वृत्ताला दोन्ही बाजूंनी दुजोरा देण्यात आलेला नाही.