Captain America 4 Teaser: नव्या कॅप्टन अमेरिकाची अ‍ॅक्शन ते रेड हल्कची एंट्री; 'कॅप्टन अमेरिका ४'चा दमदार टीझर समोर

Captain America Brave New World: मारवेल स्टुडिओजच्या बहुप्रतीक्षित 'कॅप्टन अमेरिका ४: ब्रेव्ह न्यू वर्ल्ड' चा टीझर प्रदर्शित झाला आहे.
captain america 4
captain america 4sakal
Updated on

हॉलिवूड च्या मारवेल स्टुडिओजचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'कॅप्टन अमेरिका: ब्रेव्ह न्यू वर्ल्ड'चा पहिला टीझर नुकताच रिलीज झाला आहे. 'कॅप्टन अमेरिका' फ्रँचायझीचा हा चौथा चित्रपट आहे. परंतु या चित्रपटात आता स्टीव्ह रॉजर्स म्हणजेच ख्रिस इव्हान्स दिसणार नाहीये. यावेळी अँथनी मॅकी म्हणजेच चित्रपटातील सॅम विल्सनने 'कॅप्टन अमेरिका' होण्याची जबाबदारी घेतली आहे. 'अव्हेंजर्स एंडगेम'च्या शेवटी स्टीव्ह रॉजर्सने टाईम ट्रॅव्हलकेलं होतं आणि तो पुन्हा भूतकाळात जाऊन आनंदी आयुष्य जगताना दाखवण्यात आला होता. आता ही जबाबदारी सॅम विल्सनवर आहे.

ट्रेलरची सुरुवात हॅरिसन फोर्ड आणि थडियस थंडरबोल्ट रॉस MCU चे नवीन अध्यक्ष बनण्यापासून होते. विल्सन हा थडियस रॉसच्या विरोधात एक मोठा कट सुरू असल्याचं शोधून काढतो. ट्रेलरमध्ये सॅम आपली जबाबदारी निभावण्यासाठी दमदार पद्धतीने लढताना दिसला आहे. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे की, अध्यक्ष झाल्यानंतर थंडरबोल्ट हॅरिसन फोर्डला फोन करतो आणि म्हणतो की, त्याला पुन्हा एकदा कॅप्टन अमेरिकाची गरज आहे. सॅम विल्सन हॅरिसन फोर्ड, थॅडियस थंडरबोल्ट रॉससह या नवीन अडचणींचा सामना करताना दिसत आहे. चित्रपटात थॅडियस रॉसने अध्यक्षाच्या भूमिकेत विल्यम हर्टची जागा घेतली आहे, तर मार्क रफालोने हल्कच्या भूमिकेत एड नॉर्टनची जागा घेतली आहे.

ट्रेलरमध्ये असं दिसतंय की सगळ्या मारामारी आणि स्फोटांसाठी जियानकार्लो एस्पोसिटो जबाबदार आहे, ज्याचं नाव जीडब्ल् ब्रिज आहे, जो कॉमिक बुकचं एक पात्र आहे. शेवटी, रेड हल्कच्या एन्ट्रीची एक झलक देखील आहे, जी प्रमोशनल पोस्टर्समध्ये देखील दिसली आहे. या चित्रपटात रेड हल्कदेखील पाहायला मिळणार असल्याचा अंदाज चाहते लावत आहेत.

captain america 4
Anant Radhika Wedding: समोर अमिताभ बच्चन आले अन् शाहरुखने... अनंत- राधिकाच्या लग्नात किंग खानच्या 'त्या' कृतीने जिंकली मनं

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com