शाळेत जाताना त्याने त्याचा प्रायव्हेट पार्ट... सेलिना जेटलीने सांगितले धक्कादायक अनुभव; वाचून अंगावर येईल काटा

Celina Jaitley Got Abused In School: शाळेत जाताना त्याने त्याचा प्रायव्हेट पार्ट... सेलिना जेटलीने सांगितले बालपणीचे धक्कादायक अनुभव; वाचून अंगावर येईल काटा
celina jaitley
celina jaitleyesakal
Updated on

एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री सेलिना जेटली सध्या अभिनयापासून दूर आहे. मात्र सोशल मीडियावर ती नेहमी सक्रीय असते. काही दिवसांपूर्वी कोलकाता येथे महिला डॉक्टरसोबत घडलेल्या घटनेवर अनेक कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. सेलिनाने देखील त्याविरुद्ध आवाज उठवला होता. मात्र आता सेलिनाने तिला बालपणी आलेले अनुभव सगळ्यांसोबत शेअर केले आहेत. केवळ सैल कपडे न घातल्याने आणि मोकळे केस सोडले म्हणून मुलांनी तिला खूप त्रास दिला होता. त्यावर तिच्या शाळेने तिलाच दोषी ठरवलं होतं.

काय आहे अभिनेत्रीची पोस्ट?

सेलिनाने तिच्या सहावीतला शाळेतला फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं, 'पीडित व्यक्ती नेहमीच चुकीचा असतो : हा फोटो मी सहावीत होते तेव्हाच आहे. तेव्हा जवळच्या विद्यापीठातील मुलं माझ्या शाळेबाहेर थांबू लागली. ते शाळेच्या रिक्षाच्या मागे रोज घरी जात. मी लक्षात न आल्याचं नाटक केलं आणि काही दिवसांनी माझं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी रस्त्याच्या मधोमध माझ्यावर दगडं फेकायला सुरुवात केली. त्यांना कुणीही काही बोललं नाही. मला एका शिक्षकाने सांगितलं मी "खूप मॉडर्न आहे आणि मी सैल कपडे घातले नाही आणि माझे केस तेला लावून दोन वेण्यांमध्ये बांधले नाहीत ही माझी चूक होती!'

तिने पुढे लिहिलं, 'याच वयात सकाळी शाळेच्या रिक्षाची वाट पाहत असताना एका माणसाने पहिल्यांदा माझ्याकडे पाहून त्याचे प्रायव्हेट पार्ट दाखवले होते. अनेक वर्षे मी या घटनेसाठी स्वतःलाच दोषी ठरवत होते. आणि शिक्षकांचे शब्द पुन्हा पुन्हा माझ्या मनात येत होते की ही माझी चूक आहे. ११ वीमध्ये असताना मला अजूनही आठवतं की त्यांनी माझ्या स्कूटीच्या ब्रेकची तार कापली कारण मी त्या विद्यापीठातील मुलांकडे लक्ष देत नव्हते ज्यांनी मला उद्धट नावाने हाक मारली आणि माझ्या स्कूटीवर अश्लील नोट्स ठेवल्या. माझे पुरुष वर्गमित्रही माझ्यासाठी चिंतेत होते आणि त्यांनी हे आमच्या शिक्षकांना सांगितलं.

'माझ्या वर्गशिक्षिकेने मला बोलावलं आणि मला सांगितलं की 'तू एक फॉरवर्ड प्रकारची मुलगी आहेस, स्कूटी चालवतेस आणि लहान मोकळ्या केसांसह जीन्स घालून वर्गात जातेस, त्यामुळे मुलांना वाटतं की तू फ्री स्वभावाची आहेस.' ही नेहमीच माझी चूक होती. माझ्या ब्रेकच्या तारा तुटल्यामुळे मला स्वतःला वाचवण्यासाठी माझ्या स्कूटीवरून उडी मारावी लागली. तो दिवस मला अजूनही आठवतो. मला खूप दुखापत झाली होती आणि तरीही ती माझी चूक होती. माझ्या स्कूटीचे नुकसान झालं मला शारीरिक आणि मानसिक दुखापत झाली. मला सांगण्यात आलं की ही माझी चूक आहे!'

आपल्याआपल्या देशासाठी दोन युद्ध लढलेल्या माझ्या निवृत्त कर्नल आजोबांना मला परत शाळेत घेऊन जावं लागलं… मला अजूनही आठवतं ती मुलं ज्यांनी माझा पाठलाग केला, अगदी माझ्या स्कूटीचे नुकसान केले, त्यांनी माझ्या निवृत्त कर्नल आजोबांची खिल्ली उडवत माझ्यावर अपमानास्पद टिप्पणी केली. आजोबा उभे राहिले आणि त्यांच्याकडे एकटक पाहत राहिले आणि मग त्यांनी मान हलवली आणि ते माझ्याबरोबर निघून गी तेव्हा मी त्यांचा चेहरा वाचला. ज्या लोकांसाठी त्यांनी आपला जीव धोक्यात घातला त्या लोकांबद्दल त्यांच्या डोळ्यात तिरस्कार होता. हीच वेळ आहे उभं राहण्याची आणि आपल्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी विचारण्याची. प्रत्येक वेळी आमची चूक नसते!' सेलिनाच्या या पोस्टवर अनेक मुलींनी आम्हालाही असे अनुभव आल्याचं म्हटलं आहे.

celina jaitley
Bigg Boss Marathi 5 Elimination: या आठवड्यात कोण होणार घराबाहेर? चौघांपैकी या सदस्याला मिळालेत सगळ्यात कमी वोट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.