'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्याचं 'गजानना' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; अभिनेत्याने सांगितलं कशी सुचली कल्पना

Rohit Chavan Gajanana Song Released : मिसेस मुख्यमंत्री फेम तेजस बर्वे दिग्दर्शित आणि अनुश्री फिल्म्स निर्मित ‘गजानना’ गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाणं तुफान व्हायरल झालं आहे.
gajanana song
gajanana song esakal
Updated on

सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची लगबग पाहायला मिळत आहे. काही दिवसातच घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन होईल. अश्यातच मिसेस मुख्यमंत्री फेम अभिनेता तेजस बर्वेने दिग्दर्शित केलेलं ‘गजानना’ गाणं प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसतंय. हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाला काही दिवस उरले असतानाच प्रदर्शित झालेल्या या गाण्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या गाण्यात 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातील रोहित चव्हाण मुख्य भूमिकेत दिसत आहे. तर 'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेतील मुख्य अभिनेता तेजस बर्वे याने या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे.

या गाण्यातून दिग्दर्शकीय पदार्पण करणारा तेजस गाण्याविषयी त्याचा अनुभव सांगताना म्हणाला, 'माझं आणि बाप्पाचं नातं खूप जवळचं आहे. मी बाप्पाचा लाडका आहे असं लहानपणापासून मला वाटतं. मी बाप्पाच्या आगमनाला ढोल वाजवायचो. त्यासाठी मी खास ढोलपथक जॉइन केलेलं. मला अभिनयानंतर दिग्दर्शन करायची इच्छा होती आणि मला बाप्पापासूनच करायची होती. आणि तसचं घडलं स्वप्नपूर्ती झाली आणि माझ्या नवीन कामाचं श्री गणेशा या गाण्यापासून होतोय.'

तो पुढे म्हणाला. 'एका मूर्तिकाराची आणि बाप्पाची भावनिक कथा सांगण्याचा यातून मी प्रयत्न केला आहे. या गाण्याचा शेवटचा सीन शूट करताना सेटवरील सर्वजण भावूक झाले होते. मी लहानपणी गणपती विसर्जनासाठी घाटावर गेलो होतो तेव्हा एक लहान मुलगी खूप रडत होती. त्याचवेळी मला या गाण्याची संकल्पना सुचली. आणि बाप्पाप्रति भावना मी यात मांडली. प्रेक्षकांना आमचं गाणं आवडतंय. आमच्या सर्व गाण्यांवर असंच प्रेम असू द्या हीच सदिच्छा.'

या गाण्याची निर्मिती अनुश्री फिल्म्स आणि मयूर तातुसकर यांनी केली आहे. चला हवा येऊ द्या फेम ‘रोहीत चव्हाण’ हा मुख्य कलाकाराच्या भूमिकेत असून अक्षय आणि कांचन वाटवे हे सहकलाकाराच्या भूमिकेत आहेत. दिग्दर्शकाची धुरा मिसेस मुख्यमंत्री फेम तेजस बर्वे यांनी सांभाळली आहे. या गाण्याचं संगीत मयूर बहुळकर यांनी केलं असून गीतरचना प्रणव बापट यांची आहे. अनुश्री फिल्म्सची या आधी लढला मावळा रं.., भाव भक्ती विठोबा, पंढरीची आई, तु सखा श्रीहरी, देवा गणेशा अशी गाणी प्रसिद्ध झाली आहेत.

gajanana song
माझं त्याच्यावर प्रेम... 'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्रीने दिली हार्दिकवरील प्रेमाची कबुली; उंचावल्या नेटकऱ्यांच्या भुवया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.