मायरा वायकुळच्या भावाला पाहिलंत का? दिवाळीच्या मुहूर्तावर दाखवला चेहरा, नेटकरी म्हणतात- हा तर हुबेहूब...

Myra Vaikul Little Brother Photos: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय बालकलाकार मायरा वायकुळ हिच्या छोट्या भावाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
mayra vaikul brother
mayra vaikul brother esakal
Updated on

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय बालकलाकार मायरा वायकुळ हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिच्या गोंडस चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकरी कायमच तिचं कौतुक करत आले आहेत. मायराने हिंदी मालिकांशिवाय 'नाच गं घुमा' या चित्रपटातही उत्तम अभिनय केला होता. मात्र आता चिमुकली मायरा ताई झालीये. महिन्याभरापूर्वीच वैकुळ कुटुंबात आणखी एका सदस्याचं आगमन झालं. मायराने आणि तिच्या आईबाबांनी ही गुड न्यूज शेअर केली होती. आता त्यांच्या घरातील या नव्या पाहुण्याचा चेहरादेखील समोर आला आहे. दिवाळीनिमित्त त्यांनी चिमुकल्याचं सुंदर फोटोशूट केलं आहे.

या फोटोंमध्ये मायराच्या भावाला निळ्या रंगाच्या लोकरीच्या धाग्यांमध्ये गुंडाळण्यात आलं आहे. त्यांनी ;पहिल्या पोस्टमध्ये बाळाचे हात आणि पायाचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर दुसऱ्या पोस्टमध्ये तो निळ्या लोकरीच्या कपड्यात एका बास्केटमध्ये झोपलेला दिसतोय. दुसऱ्या फोटोत तो एका फुलात झोपला आहे तर तिसऱ्या फोटोत मायरा त्याच्या डोक्यावर चुंबन घेत आहे. या फोटोंमध्ये तो अतिशय सुंदर दिसत आहे. त्याचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. गोंडस आणि गुबगुबीत अशा चिमुकल्या बाळाला पाहून नेटकरी आता निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत

मायराचा भाऊ हुबेहूब मायरासारखा दिसत असल्याचं नेटकऱ्यांरी म्हणत आहेत. त्याच्या फोटोंवर एका नेटकाऱ्याने लिहिलं, 'चेहरा अगदी सेम आहे. अगदी मायारासारखा.' दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, 'किती गोड. एकदम मायारासारखा दिसतोय. अगदी क्युटी पाइ.' आणखी एकाने लिहिलं, 'सेम टू सेम मायरा.' त्याच्या फोटोंवर नेटकरी लाइक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

mayra vaikul brother
'या' मालिकेने जिंकले सर्वाधिक पुरस्कार तर अक्षरा अधिपतीचा झाला हिरमोड, वाचा 'झी मराठी अवॉर्ड २०२४ 'च्या विजेत्यांची नावं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.