Chiranjeevi: एअरपोर्टवर चिरंजीवींनी मारला चाहत्याला धक्का, वाऱ्यासारखा व्हायरल झाला व्हिडिओ, अभिनेत्याचं हे रूप पाहून चाहते संतापले

Chiranjeevi Troll: लोकप्रिय अभिनेते चिरंजीवी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यावरून सोशल मीडियावर वादाची ठिणगी पडली आहे.
chiranjeevi
chiranjeevi esakal
Updated on

कलाकारांचे एअरपोर्ट वरील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होणं ही काही नवीन गोष्ट नाही. कुणी चांगल्या कारणामुळे चर्चेत असतं तर कुणी वाईट कारणामुळे. कुणाचं कौतुक होतं तर कुणी ट्रोल होताना दिसतं. आता दाक्षिणात्य अभिनेते चिरंजीवी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यावरून चाहते त्यांच्यावर चांगलेच संतापले आहेत. नागार्जुन आणि धनुष यांच्यापाठोपाठ आता चिरंजीवी आता चाहत्यांच्या निशाण्यावर आले आहेत. या व्हिडीओवरून चाहत्यांमध्येही तुतू मैमै होताना दिसत आहे. मात्र बहुतांश चाहते हे त्यांच्या वागण्यावर ताशेरे ओढताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये चिरंजीवी एका चाहत्याला धक्का मारताना दिसत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये चिरंजीवी आणि त्यांची पत्नी सुरेखा त्यांच्या साथीदारांसह विमानतळाच्या लिफ्टमधून बाहेर पडताना दिसत आहेत. जेव्हा इंडिगो एअरलाइन्सचा कर्मचारी चिरंजीवी यांच्याकडे सेल्फीची विनंती करतो आणि त्यांचा मार्ग अडवतो तेव्हा ते त्याला जोरात ढकलतात आणि निघून जातात. या घटनेवर लोकांच्या ऑनलाइन प्रतिक्रियांचा पूर आला आहे. त्यांचं हे वर्तन पाहून अनेकजण संतापले आहेत. या व्हिडीओवरून चाहत्यांनी दाक्षिणात्य अभिनेत्यांनादेखील सुनावले आहेत.

चिरंजीवी यांच्या व्हिडिओवर एका नेटकऱ्याने लिहिलं, 'ते २ मिनिटं थांबून फोटो देऊ शकत होते. ही कोणती पद्धत आहे आहे नाही म्हणण्याची?' आणखी एकाने लिहिलं, 'त्यांनी कसं ढकललं त्याला, नीट सांगू शकत होते.' दुसऱ्याने लिहिलं, 'आपण उगीच साऊथ इंडस्ट्रीला डोक्यावर घेतलंय. त्यांचे कलाकारही आपल्या कलाकारांसारखेच आहेत. त्यांना तरी त्यांच्या चाहत्यांची कुठे किंमत आहे.' आणखी एकाने लिहिलं, 'तो रस्त्यात आला आणि त्याने ढकललं पण तो नीट निघून जाऊ शकत होता. असा धक्का मारायची गरज नव्हती.' तर चिरंजीवीचे चाहते त्याच्या बाजूने बोलताना दिसत आहेत. चिरंजीवी खूप व्यग्र असतात. त्यांच्याकडे वेळ नसेल, तुम्ही त्यांचा वेळ का वाया घालवता?, त्यांनी कुठे धक्का मारलाय, त्यांनी फक्त त्याला बाजूला केलं. असं म्हणत काही नेटकऱ्यांनी त्यांची बाजू घेतली आहे.

chiranjeevi
Arjun Rampal: अर्जुन रामपालने सांगितलं २१ वर्षाचा संसार मोडण्याचं कारण, म्हणाला- मी ते करायला नको होतं...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.