महाराष्ट्रातील राजकारण रंगमंचावर; एकनाथ शिंदे यांच्यावर नाटक येणार; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Mala Kahi Sangaychay New Play On Cm Eknath Shinde: गेल्या काही वर्षात महाराष्ट्राचं राजकारण प्रचंड बदललं. आता ते बदल नेमके कसे झाले हे ते सांगणार आहेत तेही एका नाटकाद्वारे.
cm eknath shinde
cm eknath shinde esakal
Updated on

गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली. काही पक्ष फुटले, आमदारांनी पक्ष बदलले. सत्ता पालटली. आरोप प्रत्यारोप झाले. कुणी पायउतार झालं तर कुणाच्या डोई मुकुट सजला. हे सगळं जनतेने याची देही याची डोळा पाहिलं. मतं फुटली. सगळाच बाजार झाला. मात्र अजूनही अनेक आतल्या गोष्टी मतदारांना ठाऊक नाहीत. याचं काही गोष्टी आता सगळ्यांसमोर आणण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सज्ज झाले आहेत. लवकरच त्यांच्या आयुष्यावर आधारित एक नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यात लोकप्रिय मराठी अभिनेता मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

लवकरच हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या बायोपिकचा जमाना आहे. यापूर्वी आनंद दिघे यांच्यावर आधारित 'धर्मवीर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ज्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित हे नाटक रंगभूमीवर येणार आहे. 'मला काहीतरी सांगायचंय' असं या नाटकाचं नाव असून हे नाटक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित असणार आहे. हे नाटक एकपात्री असणार आहे तर दीर्घांक नाटकाद्वारे एकनाथ शिंदे नेमक काय सांगणार याबाबत प्रेक्षकांनाही उत्सुकता आहे.

या एकपात्री नाटकाद्वारे एकनाथ शिंदे यांच्या नाट्यमय राजकीय खेळीचा डाव समोर येणार का असाही प्रश्न विचारण्यात येतोय. या नाटकात मुख्य भूमिकेत अभिनेता संग्राम समेळदिसणार आहे. दोन दिवसात या नाटकाची अधिकृत घोषणा करण्यात येणार येईल. सध्या नाटक सेन्सॉर बोर्डाकडे आहे.

cm eknath shinde
या दिवशी साजरा होतोय नॅशनल सिनेमा डे; फक्त ९९ मध्ये पाहू शकता कोणताही सिनेमा; वाचा कसा घ्याल ऑफरचा लाभ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.