निलेश साबळेच्या 'हसताय ना हसायलाच पाहिजे'ने तीन महिन्यात गुंडाळला गाशा; कार्यक्रम झाला बंद, कारण काय?

Hastay Na Hasaylach Pahije Off Air: लोकप्रिय अभिनेता दिग्दर्शक निलेश साबळे याच्या 'हसताय ना हसायलाच पाहिजे' या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
hastay na hasaylach pahije off air
hastay na hasaylach pahije off air sakal
Updated on

छोट्या पडद्यावर गेल्या काही काळात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. कलर्स मराठीवरील 'हसताय ना हसायलाच पाहिजे' या कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा रंगली. त्याचं कारण म्हणजे 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाने घेतलेला प्रेक्षकांचा निरोप आणि त्याच धाटणीचा, त्याच कलाकारांसह सुरू झालेला 'हसताय ना हसायलाच पाहिजे' हा कार्यक्रम. कलर्स मराठीवरील 'हसताय ना हसायलाच पाहिजे' या कार्यक्रमात निलेश साबळे, भाऊ कदम, ओंकार भोजने पाहायला मिळाले होते. मात्र या कार्यक्रमाने अवघ्या तीन महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. हे या कार्यक्रमाचं पहिलं पर्व होतं आणि लवकरच दुसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येईल असंही सांगितलं जात आहे.

'हसताय ना हसायलाच पाहिजे' हा कार्यक्रम २४ एप्रिल रोजी सुरू झाला होता. आता तीन महिन्यात बंद होणार आहे. या कार्यक्रमाची रूपरेखा अगदी 'चला हवा येऊ द्या' सारखी असल्याने या कार्यक्रमावर काही प्रेक्षक नाराज होते. तर झी मराठीसोडून निलेश कलर्स मराठीवर आल्यावर इथे काहीतरी नवीन पाहायला मिळेल अशी प्रेक्षकांना आशा होती. मात्र तसं काही घडलं नाही. असं असलं तरी या कार्यक्रमाचा टीआरपी इतर कथाबाह्य कार्यक्रमांपेक्षा चांगला होता. काही कालावधीनंतर प्रेक्षकांनी कार्यक्रमाला पसंती दाखवली होती. मात्र तरीही आता हा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय वाहिनीकडून घेण्यात आला आहे. नव्याने सुरू होणाऱ्या 'बिग बॉस मराठी पर्व ५' साठी हा निर्णय घेण्यात आला आहे असं सांगण्यात येत आहे.

'बिग बॉस मराठी ५' संपल्यानंतर पुन्हा एकदा नव्या जोमाने या कार्यक्रमाचं दुसरं पर्व सुरू करण्यात येणार आहे. मात्र आता हा कार्यक्रम लवकर बंद केल्याने चाहतेही वाहिनीवर नाराज आहेत. कार्यक्रमाला किमान थोडा वेळ मिळायला हवा होता असं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे प्रेक्षक 'बिग बॉस मराठी ५' साठी उत्सुक आहेत.

hastay na hasaylach pahije off air
तुम्ही खून करून पळपुट्यासारखे पळून जाता... दाभोळकरांच्या मारेकऱ्यांबद्दल सोनाली कुलकर्णीचं रोखठोक मत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.