New Serial: टीआरपीसाठी केदार शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! बिग बॉस संपल्यावर एक दोन नाही तर या चार मालिका येणार भेटीला

Colors Marathi New Serial: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' लवकरच निरोप घेणार आहे. त्यानंतर कलर्सवर तीन नव्या मालिका येणार आहेत.
colors marathi new serials
colors marathi new serialsesakal
Updated on

टीआरपीसाठी सगळ्याच वाहिन्या जोर लावताना दिसत आहेत. स्टार प्रवाह या यादीत पहिल्या स्थानावर आहे. तर कलर्स मराठी आणि झी मराठी एकमेकांना टक्कर देताना दिसतायत. अशात आता टीआरपी यादीत वर येण्यासाठी कलर्स वाहिनी जोर लावताना दिसतेय. सध्या कलर्सवरील बिग बॉस मराठी टीआरपीच्या यादीत मालिकांनाही मागे टाकताना दिसतोय. 'बिग बॉस मराठी ५' चांगलाच गाजतोय. मात्र हा सीझन लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे त्याजागी कोणते नवे कार्यक्रम येणार हे पाहण्यासाठी आता प्रेक्षक उत्सुक आहेत. पाहूया कोणत्या आहेत त्या मालिका.

कलर्स मराठीच्या नव्या मालिका

सध्या कलर्सवरील दोन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. एक म्हणजे 'अबीर गुलाल' आणि दुसरी ''बिग बॉस मराठी ५' त्याजागी आता एकूण चार मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यातील पहिली मालिका आहे अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी 'आई तुळजाभवानी' हिची. ही मालिका येत्या ३ ऑक्टोबरपासून प्रदर्शित होणार आहे. तर त्यानंतर कलर्स वाहिनीने आणखी ३ मालिकांची घोषणा केली आहे. आणि त्या मालिकांचे प्रोमोही प्रदर्शित केले आहेत. यातील पहिली मालिका आहे महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल झन्नाट, रांगडी प्रेमकथा 'लय आवडतेस तू मला'. यात नवे कलाकार पाहायला मिळतायत.

अशोक सराफही येणार भेटीला

दुसरी मालिका आहे सामान्य स्त्रियांच्या असामान्य कथा दाखवण्याचा नवा कार्यक्रम ‘बाईपण भारी रं’. यात अनेक स्त्रियांच्या संघर्षाच्या गाथा दाखवण्यात येणार आहेत. तर तिसरी मालिका खूपच खास आहे कारण यातून सगळ्यांचे लाडके अशोक सराफ छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहेत. या मालिकेचं नाव आहे 'अशोक मा. मा.' ते चुकीच्या गोष्टींना योग्य करणार, सगळ्यांना शिस्त लावणार, आणि आपल्या कमाल परफॉर्मन्सने सर्वांनाच थक्क करणार! असं लिहीत या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या तीनही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. संपूर्ण प्रेक्षकवर्ग या मालिकांची आतुरतेने वाट पाहत आहे.

colors marathi new serials
Exclusive: त्या दिवशी छत्रपतींचा जयजयकार न करण्यावर अरबाज पटेलने दिलं उत्तर; माफी मागत म्हणाला- बाहेर तसं वाटलं पण...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.