मराठी मालिका म्हणजे घराघरात पाहिली जाणारी गोष्ट. वाहिन्यांमधील कलाकार म्हणजे आपल्याच घरातील सदस्य असल्याची प्रेक्षकांची भावना असते. मात्र कोणती वाहिनी प्रेक्षकांच्या आवडीची आहे. कोणती वाहिनी सगळ्यात जास्त पाहिली जाते हे समजतं टीआरपीवरून. लोकप्रिय मालिका आणि लोकप्रिय वाहिनी हे समजावण्याचा मार्ग म्हणजे टीआरपी. आता या आठवड्याचा टीआरपी समोर आला आहे. गेले काही आठवडे दुसऱ्या स्थानावर असलेली कलर्स मराठी वाहिनी या आठवड्यात मात्र खाली घसरली आहे. या आठवड्यात पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीने कलर्सला मागे टाकलं आहे.
गेले चार आठवडे सातत्याने क्रमांक २ वर असलेली कलर्स मराठी आता थेट चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. कलर्स मराठीला 'बिग बॉस मराठी ४' चा चांगलाच फायदा झाला होता. मात्र आता बिग बॉस संपल्यानंतर कलर्स वाहिनी थेट चौथ्या स्थानावर गेली आहे. वाहिनीचा टीआरपी १७५ ने घसरला आहे. तर झी मराठीने पुन्हा आघाडी घेत तब्बल ५२९ पॉईंट्स मिळवत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. पुन्हा झी मराठी कलर्सला वरचढ ठरली आहे. अशात पहिल्या क्रमांकावर स्टार प्रवाहने आपलं स्थान अढळ ठेवलं आहे. तब्बल १५७४ पॉईंट्ससोबत स्टार प्रवाह प्रथम क्रमांकावर आहे. तर ४५७ पॉईंट्ससोबत सोनी सब तिसऱ्या क्रमांकावर आहे.
गेल्या एकही दिवसात कलर्स मराठी नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. नुकतीच 'आई तुळजाभवानी' आणि 'लय आवडतेस तू मला' या मालिका सुरू करण्यात आल्या. त्यात आता 'पिंगा गं पोरी पिंगा' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या मालिकांचा कलर्सला फायदा होणार का हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.