Aai Tulja Bhawani: कलर्स मराठीवरील 'आई तुळजाभवानी'चा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित; कोण आहे ही अभिनेत्री?

Colors Marathi New Serial Aai Tulja Bhawani New Promo: छोट्या पडद्यावरील आणखी एका नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकही खुश झाले आहेत.
aai tuljabhawani new promo
aai tuljabhawani new promoesakal
Updated on

सध्या मराठी वाहिन्यांवर नवनव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. लवकरच काही जुन्या मालिका निरोप घेणार आहेत. कलर्स मराठी आणि स्टार प्रवाह वाहिनीवर काही नव्या मालिका सुरू होणार आहेत. या मालिकांचे प्रोमोही आता समोर येत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या 'गणेशोत्सव २०२४' मध्ये स्टार प्रवाह वाहिनीवरील दोन नव्या मालिकांचे प्रोमो प्रदर्शित करण्यात आले. आता त्यांच्यापाठोपाठ कलर्स मराठी वाहिनीवरील एका नव्याकोऱ्या मालिकेचा प्रोमोही प्रदर्शित करण्यात आला आहे. कलर्स मराठीवर लवकरच 'कुलस्वामिनी आई तुळजाभवानी' (Aai Tulja Bhawani ) ही मालिका सुरू होणार आहे. नुकताच या मालिकेचा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.

कलर्स मराठी वाहिनीवर 'आई तुळजाभवानी' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा दमदार प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये दैत्यांच्या त्रासाला वैतागलेलं आणि उध्वस्त झालेलं गाव दाखवण्यात येत आहे. तर एका डोंगरावर अष्टभुजाधारी आई तुळजाभवानी दिसतेय. त्या पर्वतावरून आई थेट त्या गावात जातेय आणि दृष्टांचा संहार करायला सज्ज होतेय. तिच्या डोळ्यात अंगार आहे. कपाळी पिवळा मळवट आहे. तिला पाहून सगळे गावकरी हात जोडताना दिसतायत. हा प्रोमो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. हा प्रोमो शेअर करत वाहिनीने लिहिलं, 'भक्तांच्या हाकेला धावून येणार, अष्टभुजा ‘आई तुळजाभवानी’ प्रकटणार. अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी, ‘आई तुळजा भवानी’, लवकरच आपल्या कलर्स मराठीवर.'

या प्रोमोमध्ये दिसणारी अभिनेत्री कोण आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. प्रोमोमध्ये अभिनेत्रीचा चेहरा पूर्ण दिसलेला नसल्याने ही अभिनेत्री कोण आहे हे समजू शकलेलं नाही. कदाचित पुढील प्रोमोमध्ये याबद्दल वाहिनीकडून अधिक माहिती देण्यात येईल. मात्र सध्या तरी हा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असल्याचं दिसतंय. तर ही मालिका रात्री ८. ३० वाजता 'अबीर गुलाल' या मालिकेच्या वेळेस प्रक्षेपित होण्याची शक्यता आहे.

aai tuljabhawani new promo
Pushpa 2: प्रदर्शनापूर्वीच करोडपती झाला 'पुष्पा २'; चित्रपटाचं अर्ध बजेट झालं वसूल, केली 'इतकी' कमाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.