Marathi Serial Off Air: अरेच्चा! आताच सुरू झाली आणि संपलीसुद्धा; कलर्स मराठीची मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

Colors Marathi Serial Off Air: छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याजागी नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
colors marathi serial off air
colors marathi serial off air esakal
Updated on

छोट्या पडद्यावर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यामुळे काही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतात. काही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करतात तर काही मालिकांकडे प्रेक्षक पाठ फिरवतात. काही मालिकांना कमी टीआरपीमुळे प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागतो. आता अशीच एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अवघ्या ३ महिन्यात ही मालिका गाशा गुंडाळताना दिसणार आहे. त्या जागी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कमी टीआरपीमुळे ही मालिका बंद करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.

सध्या कलर्स मराठी नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. टीआरपी यादीत वरचं स्थान मिळवण्यासाठी कलर्स वाहिनी प्रयत्न करताना दिसतेय. त्यासाठी नवीन आशय असलेल्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या जात आहेत. अशात आता 'दुर्गा' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'दुर्गा' ही मालिका २६ ऑगस्टपासून ७. ३० वाजता प्रक्षेपित करण्यात येणार आहे. त्यामुळे ७. ३० वाजता लागणारी 'अंतरपाट' ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 'अंतरपाट' ही मालिका जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

घाईघाईत संपवलं कथानक

'अंतरपाट' या मालिकेत आता क्षितिज हा जान्हवीला विसरून गौतमीसोबत संसार करत आहे. तर आता गौतमीला विदुलाचा खरा चेहरा माहीत झाला आहे. त्यामुळे ती घरातील सगळ्यांसमोर तिचं सत्य उघड करत आहे. ती थेट पोलिसांना घेऊन येत तिला अटक करणार आहे. तर दुसरीकडे जान्हवी देखील दुसऱ्या मुलाशी लग्नाला तयार झाली आहे. आता शेवटच्या २ भागात हे कथानक काय वळण घेणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. मात्र नुकतीच सुरू झालेली ही मालिका बंद करण्यात येत असल्याने प्रेक्षक वाहिनीवर नाराज आहेत.

colors marathi serial off air
कलाकार ठरले, घोषणा अन् वादही झाले... पुढे काय? महेश मांजरेकरांचा 'तो' महत्वकांक्षी चित्रपट झाला डब्बाबंद?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.