छोट्या पडद्यावर सध्या टीआरपीसाठीची शर्यत पाहायला मिळतेय. टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी आणि प्रेक्षकांमध्ये वाहिनीची लोकप्रियता वाढवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कलर्स मराठी, झी मराठी आणि स्टार प्रवाह या वाहिन्यांमध्ये ही शर्यत पाहायला मिळते. अशातच कलर्स वाहिनी टीआरपी वाढवण्यासाठी निरनिराळ्या युक्त्या करताना दिसतेय. कलर्सवर लवकरच दोन नाय मालिका सुरू होणार आहेत. मात्र त्यासोबतच कलर्स वाहिनीवर आणखी एक जुनी मालिका पुन्हा सुरू होणार आहे. लोकप्रिय मराठी कलाकारांच्या भूमिका असलेली ही मालिका आधीही टीआरपीमध्ये चांगलीच गाजली होती.