कलर्स वाल्यांचं नेमकं काय सुरू आहे? दोन नव्या मालिका होणार बंद; नेटकऱ्यांनी चॅनेलला सुनावलं, म्हणाले- आम्ही इथे...

Colors Marathi Off Air Serial: छोट्या पडद्यावर नव्याने भेटीला आलेल्या मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांनी चॅनलला सुनावलं आहे.
Colors Marathi
Colors Marathi Off Air Serialesakal
Updated on

Latest Entertainment News: छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या जवळच्या असतात. संध्याकाळी घराघरात आवडीने मालिका पाहिल्या जातात. त्यातील काही मालिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात तर काही मालिका लगेच विस्मरणात जातात. प्रत्येक मालिकेला चॅनेलतर्फे स्वतःचा प्रेक्षकवर्ग निर्माण करण्यासाठी वेळ दिला जातो. मात्र कलर्स वाहिनीवर सध्या नवा ट्रेंड पाहायला मिळतोय. कलर्स वाहिनीचे प्रोग्रमिंग हेड बदलल्यापासून वाहिनीवरचे अनेक कार्यक्रम कमी कालावधीमध्ये बंद करण्यात येत आहेत. गेल्या काही महिन्यात कलर्सवरील अगदी वर्षदेखील पूर्ण न झालेल्या मालिका बंद करण्यात आल्या. आता पुन्हा एकदा हा प्रकार पाहायला मिळतोय. पुन्हा दोन नव्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. त्यामुळे आता नेटकरी वाहिनीला जाब विचारत आहेत.

कलर्स वाहिनीवर लवकरच 'अशोक मा मा' आणि ' पिंगा गं पोरी ' या मालिका सुरू होणार आहेत. मात्र या मालिकांसाठी दोन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत असं सांगण्यात येतंय. या मालिका आहेत 'दुर्गा' आणि 'अबीर गुलाल'. या यातील 'दुर्गा' ही मालिका अगदीच ३ महिन्यांपूर्वी सुरू झाली होती. अनेक नेटकऱ्यांना या मालिकेचा विषयही ठाऊक नाही. तर दुसरी मालिका 'अबीर गुलाल' ही सहा महिन्यांपूर्वी सुरू झाली होती. या मालिकेचा प्रेक्षकवर्ग तयार झाला होता. मालिकेला चांगला प्रतिसादही मिळत होता. मात्र आता मालिकेतील मुख्य अभिनेता अक्षय केळकर याने निरोप घेत असल्याची पोस्ट केली. त्यानंतर या दोन्ही मालिका बंद होणार असल्याचं सांगण्यात येतंय, यावर नेटकऱ्यांनी चॅनेलला सुनावलंय.

एका नेटकऱ्याने लिहगील, 'म्हंटल होत ना कलर्स मराठी तीन चार महिन्यात मालिका बंद करतील आणी नवीन मालिका आणतील परत तेच करतील. आता नवीन दोन मालिका येणार त्या पण दोन चार महिन्यात बंद नाही केल्या म्हणजे मिळवलं. दुर्गा मालिका मी अजून पाहिली पण नव्हती नीट कशी होती ती.' दुसऱ्या युझरने लिहिलं, 'तुमच्याकडे बिग बॉस शिवाय दुसरं काहीच नाहीये का?' आणखी एका युझरने लिहिलं, 'कधी सुरू झाल्या कधी संपल्या काही कळलं पण नाही. कलर्सने रिऍलिटी शो दाखवावे फक्त.' आणखी एकाने लिहिलं, 'कलर्स मराठी हे चॅनेलचं बंद होणार आहे बहुतेक थोड्या दिवसांनी. चॅनेलचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांच्या निर्णयावर प्रेक्षक मात्र नाराज आहेत.

Colors Marathi
आधी सगळे नावं ठेवत होते आता मात्र... 'हंटर' मधील 'त्या' बोल्ड सीनवरबद्दल पहिल्यांदाच बोलली सई ताम्हणकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.