८० आणि ९० च्या दशकात आपल्या नृत्यकौशल्य आणि अदांनी ज्या अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं ती अभिनेत्री म्हणजे मिनाक्षी शेषाद्री. उत्तम अभिनयासह मिनाक्षी यांनी कायमच नृत्यकौशल्यातून प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. बराच काळ अभिनय क्षेत्रापासून त्या दूर असल्या तरी नृत्यासोबतचं घट्ट नातं कायम आहे. म्हणूनच वयाच्या साठीतही अंगाची लवचिकता आणि सुंदर नृत्यकौशल्याने त्या चाहत्यांना चकीत करतात. नुकताच सोशल मिडीयावर एक व्हिडीओ चर्चेत आलाय. ज्यात त्या नृत्य करताना दिसत आहेत.
सुप्रसिद्ध नत्यदिग्दर्शक आशिष पाटीलने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडिओत आशिष पाटील चक्क मिनाक्षी शेषाद्री यांच्यासोबत सुंदर नृत्य सादर करताना दिसतोय. आशिषसाठी देखील ही स्वप्नपुर्ती असल्याचं तो या व्हिडिओत म्हणतोय. आशिष आणि मिनाक्षी यांचा एकत्र डान्स या व्हिडिओत बघायला मिळतोय. मिनाक्षी शेषाद्री यांच्या अदांनी सजलेला हा व्हिडिओ प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरलाय.
मिनाक्षी या साठ वर्षांच्या आहेत, मात्र त्यांचा डान्स व्हिडीओ हा तरुणाईलाही लाजवण्यासारखा आहे. साठीतही त्यांचा शारीरिक फिटनेस आणि लवचिकता लक्ष वेधून घेणारी आहे. गेल्या काही वर्षात मिनाक्षी शेषाद्री सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात, शिवाय त्यांचे डान्स व्हिडिओ देखील शेयर करत असतात. सध्या अभिनय क्षेत्रात काम करत नसल्या तरी सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्या चाहत्यांशी जोडल्या गेल्या आहेत.
आशिष हा हिंदीसह मराठीतील लोकप्रिय नृत्य दिग्दर्शक आहे. सोशल मिडीयावरही त्याचे डान्स व्हिडीओ चर्चेत असतात. मात्र एव्हरग्रीन अभिनेत्री मिनाक्षी यांच्यासोबत नृत्य केल्यानंतरचा आनंद त्याने या पोस्टमध्ये शेयर केला आहे. तो लिहीतो की, "खऱ्याखुर्या दामिनी सोबत... सगळ्यांच्या आशिर्वादाने मला मिनाक्षी शेषाद्री मॅमसोबत नृत्य सादर करण्याची संधी मिळाली. त्यांच्यासोबत नृत्यदिग्दर्शन आणि काम करण्याआधी मी त्यांचं काम फक्त स्क्रिनवर पाहिलं होतं. माझ्यातलं लहान मुल खूप उत्सुक होतं. मॅम तुम्ही फक्त हावहाव आणि डान्सचं सुंदर करत नाही तर माणूस म्हणून पण तुम्ही छान आहात.'
त्याने पुढे लिहिलं, 'इतक्या मोठ्या कलाकार पण किती नम्र आहात. ही माझ्यासाठी कायम लक्षात राहण्यासारखी आठवण आहे. आगामी काळात आणखी व्हिडीओ करण्याची वाट बघतोय." मिनाक्षी यांची हिंदी सिनेसृष्टीत दामिनी म्हणून ओळख आहे. 1993 'दामिनी' या त्यांच्या चित्रपटाला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. 'हिरो', 'आंधी तुफान', 'मेरी जंग', 'स्वाती', 'दिलवाला', 'डकैत', 'शहनशाह', 'महादेव','आवारगी', 'दहलीज', 'स्वाती' हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.