सध्या अनेक बॉलिवूड अभिनेत्री आपल्या करिअरसोबतच आपल्या आई होण्यालाही प्राधान्य देताना दिसतायत. आलिया, सोनम, करिना, बिपाशा यांसारख्या अभिनेत्रींनी करिअरच्या शिखरावर असताना बाळाला जन्म देत सगळ्यांसाठी नवा पायंडा पाडला आहे. लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिनेदेखील नुकताच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. तिने ८ सप्टेंबर रोजी मुलीला जन्म दिला. त्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये एकच आनंदाची लहर उमटली. आता दीपिकाने तिचा आई होण्याचा अनुभव सांगितलाय. तिने फक्त चार शब्दात तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दीपिका आणि रणवीर यांच्या बाळाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. त्यांनी फेब्रुवारी महिन्यात गुडन्यूज शेअर करत आपण गरोदर असल्याचं सांगितलं होतं. आता अखेर त्यांच्या बाळाच्या जन्मानंतर आई दीपिकाचं आयुष्यही बदललं आहे. दीपिकाने तिचा इंस्टाग्रामचा बायो बदलत तिच्या आयुष्यात सध्या काय सुरू आहे याबद्दल सांगितलं आहे. तिने इंस्टाग्राम बायो बदलत लिहिलं, 'फीड, बॅर्प, स्लीप, रिपीट म्हणजेच दूध द्या, ढेकर काढा, झोपवा आणि पुन्हा पुन्हा हेच करा. दीपिका सध्या तिच्या चिमुकलीची काळजी घेण्यात गुंतली आहे. तर तिचा हॉस्पिटलमधून बाहेर पडद्यानंतरचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
दीपिकाला नुकताच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तिचा हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतरचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ती गाडीमधून घरी जाताना दिसतेय. या गाडीत दीपिका, रणवीर, त्यांची मुलगी आणि दीपिकाचे वडील बसलेले दिसत आहेत. तर दुसरीकडे चाहते आता त्यांच्या बाळाला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. सोबतच दिपवीर त्यांच्या बाळाचं नाव काय ठेवणार हे जाणून घेण्यासाठीही चाहते आतुर आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.