गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी बाप्पाच्या दर्शनाला पोहोचले दीपिका- रणवीर; होणाऱ्या बाळाच्या आजी-आजोबांचीही हजेरी

Deepika Padukone Ranveer Singh At Siddhivinayak Temple : लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहोचले आहेत.
deepika padukone
deepika padukone esakal
Updated on

Deepika Padukone Pregnancy: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच आई होणार आहे. दीपिका आणि रणवीर लवकरच आई- बाबा होणार आहेत. सप्टेंबर महिन्यात दीपिका तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे त्यांचे चाहते प्रचंड आनंदी आहेत. तर दुसरीकडे अजूनही दीपिकाचं फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिने अतिशय सुंदर असं फोटोशूट करत सगळ्यांचं तोंड बंद केलं. आता रणवीर दीपिकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघा एक दिवस बाकी असताना रणवीर आणि दीपिका बाप्पाच्या चरणी लिन झाले आहेत.

उद्या भक्तांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. त्यापूर्वी रणवीर आणि दीपिका दादर येथील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले आहेत. या व्हिडिओमधील त्यांच्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दीपिकाने हिरव्या रंगाची काठापदराची साडी नेसली आहे. केसांचा बन घातला आहे तर कानात मोठेसे कानातले आहेत. रणवीरने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दीपिकाचा गरोदरपणातील ग्लो चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत आहे.

दीपिका आणि रणवीर यांनी नुकतंच बांद्रा येथे नव्या घराची खरेदी केली होती. त्यामुळे ते आपल्या नव्या घरात बाळाचं स्वागत करणार असल्याचं बोललं जातंय. तर त्यांच्या कामाबद्दल सांगायचं तर दीपिका शेवटची 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटात दिसली होती. बाळाला जन्म दिल्यानंतर ती काही महिन्यात पुन्हा कामाला सुरुवात करेल असं सांगितलं जातंय. तर रणवीरच्या सिंघम ३ मध्ये दिसण्याची शक्यता आहे. तो यापूर्वी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' मध्ये दिसला होता.

deepika padukone
सगळ्यांच्या नाकावर टिच्चून झापून झुपक सुरज झाला घराचा कॅप्टन; नेटकरी म्हणाले- आता फक्त कॅप्टन झालाय नंतर...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.