Entertainment News: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांना सप्टेंबर महिन्यात कन्यारत्नाची प्राप्ती झाली. त्यांनी एक पोस्ट करत ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. दिवाळीच्या मुहूर्तावर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रणवीर आणि दीपिका यांनी त्यांच्या मुलीचं नाव जाहीर केलेलं. त्यांनी त्यांच्या मुलीचं नाव दुआ ठेवलं. दुआ पादुकोण सिंह या नावाने ती ओळखली जाणार आहे. अनेक नेटकरी तिच्या नावाचं कौतुक करताना दिसतायत. मात्र असं असताना आता सोशल मीडियावर एका नव्या वादाला तोंड फुटलंय. दुआ या नावावरून सोशल मीडियावर नाराजी नाट्य सुरू आहे. तिचं नाव दुआ का ठेवलं? प्रार्थना का नाही असा प्रश्न आता अनेक नेटकरी विचारत आहेत.
रणवीर आणि दीपिका यांनी मुलीच्या पायांचा फोटो शेअर करत मुलीचं नाव जाहीर केलेलं. त्यांनी लेकीला पादुकोण आणि सिंह अशी दोन्ही नावं दिल्याने अनेकांनी त्यांचं कौतुक केलं. मात्र अनेकांना तिचं दुआ हे नाव खटकलंय. रणवीर आणि दीपिका यांनी त्यांच्या पोस्टमध्ये ही मुलगी म्हणजे आमच्या प्रार्थनेचं फळ आहे, दुआचा अर्थ प्रार्थना असं लिहिलं होतं. त्यावरून आता आता अनेक नेटकरी तुम्ही मुलीचं नाव दुआ का ठेवलं प्रार्थना का नाही ठेवलं असा प्रश्न विचारत आहेत.
एकीकडे काही नेटकऱ्यांनी तिच्या नावाला चांगलं म्हंटल आहे. मात्र बहुतांश नेटकरी त्यांच्या विरोधात आहेत. एकाने लिहिलं, 'दुआचा अर्थ प्रार्थना होतो मग प्रार्थना का नाही?' दुसऱ्याने लिहिलं, 'तुमच्यापेक्षा अनुष्का विराट चांगले आहेत. त्यांनी खूप विचार करून युनिक नावं दिली आहेत.' आणखी एकाने लिहिलं, 'दुआपेक्षा चांगलं नाव तुम्हाला मिळालं नाही का? उगीच अरेबिक नावांचा आधार घ्यायला जातात.' अनेक नेटकऱ्यांनी त्या दोघांवर नाराजी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.