बॉलिवूड अभिनेता रणवीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. त्यांच्या आयुष्यात काही महिन्यांपूर्वीच एका चिमुकल्या परीचं आगमन झालं आहे. त्यांच्या मुलीच्या येण्याने आता दीपिका आणि रणवीर दोघेही तिच्या पालनपोषणात व्यग्र आहेत. चाहते त्यांच्या मुलीचा चेहरा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र आता ते दोघे एका वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. रणवीर आणि दीपिका यांनी त्यांचं मुंबई येथील प्रभादेवीमधील एक फ्लॅट भाड्याने दिला आहे. तीन वर्षांसाठी भाड्याने दिलेल्या या फ्लॅटचं भाडं वाचून तुमचंही डोकं चक्रावेल.