दीपिका- रणवीरने शेअर केला लेकीचा पहिला फोटो; नावही सांगितलं, छोटंसं पण अर्थपूर्ण नाव वाचून नेटकरी करतायत कौतुक

Deepika Padukone Ranveer Singh Daughter Name: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने दोन महिन्यांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला होता.
deepika ranveer
deepika ranveeresakal
Updated on

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांच्या आयुष्यात दोन महिन्यांपूर्वी एका गोंडस मुलीचं आगमन झालं. गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर दीपिका आणि रणवीर यांच्या घरी लक्ष्मी आली. एक पोस्ट शेअर करत त्यांनी ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता दिवाळीच्या मुहूर्तावर विशेषतः लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दीपिका आणि रणवीर या जोडीने चाहत्यांसोबत आणखी एक गोष्ट शेअर केली आहे. रणवीर आणि दीपिका यांनी आज त्यांच्या मुलीचं नाव शेअर केलं आहे. एक पोस्ट करत त्यांनी मुलीचं पूर्ण नाव सांगितलं आहे. हे वाचून नेटकरी त्यांचं कौतुक करत आहेत.

काय आहे मुलीचं नाव?

दीपिका आणि रणवीर यांनी आपल्या मुलीचं नाव 'दुआ' ठेवलं आहे. या जोडीने मुलीच्या पायांचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं, 'दुआ पादुकोण सिंह' दुआ म्हणजे प्रार्थना. तिचं नाव दुआ ठेवण्याचं कारण म्हणजे ती आमच्या प्रार्थनाचं फळ आहे. आम्ही प्रेम आणि कृतज्ञतेने भरलेलो आहोत. तुमचे दीपिका आणि रणवीर.' त्यांच्या या पोस्टवर नेटकरी आता भरभरून प्रतिक्रिया देत आहेत,.

नेटकरी आता त्यांच्या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. त्यांच्या मुलीचं नाव नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलं आहे. रणवीर आणि दीपिका यांचा 'सिंघम अगेन' हा चित्रपट आज १ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालाय.

deepika ranveer
मुलगा होणार की मुलगी? जन्माआधीच मराठी अभिनेत्रीने सांगितलं बाळाचं जेंडर; शेअर केला व्हिडिओ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.