Deepika Padukone: 'कल्की २८९८ एडी' पार्ट २ मध्ये नसणार दीपिका पादुकोण? चित्रपटाशी संबंधित व्यक्तीची माहिती, हे आहे कारण

Deepika Padukone Exit From Kalki 2898 Ad: दिग्दर्शक नाग अश्विन याच्या 'कल्की २८९८' मधून दीपिका बाहेर होणार असल्याच्या चर्चा आहेत. चित्रपटाशी संबंधित व्यक्तीने ही माहिती दिली आहे.
deepika padukone
deepika padukone sakal
Updated on

दाक्षिणात्य दिग्दर्शक नाग अश्विन याच्यावर चाहते सध्या प्रचंड फिदा आहेत. 'कल्की २८९८ एडी'मुळे प्रेक्षक त्याचे फॅन झाले आहेत. 'कल्की २८९८ एडी' ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आता मेकर्स या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांच्या कौतुकाला पात्र ठरला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ८०० कोटींची कमाई केली आहे. प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका यांच्या जबरदस्त अभिनयाने आणि ऍक्शनने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता प्रेक्षक चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र पार्ट २मध्ये दीपिका दिसणार नाही असं सांगितलं जातंय.

या चित्रपटाशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीने ही माहिती दिली आहे. तो म्हणाला, 'या चित्रपटाच्या सिक्वेलची प्लॅनिंग कशीही होणारच आहे. मग कल्कीचं भविष्य काहीही असेल भाग २ येणारच. आता जेव्हा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरलाय त्यामुळे मेकर्सला वाटतंय की पुढचा भागही लवकरात लवकर आणावा. पण असं कळतंय की या पार्टमधे दीपिका नसणार आहे. दीपिका 'कल्की २८९८ एडी'च्या सिक्वेलचा भाग असेल की नाही हे सध्या स्पष्ट नाही.'

तो पुढे म्हणाला, 'अनेक सूत्रांनी मला माहिती दिली आहे की निर्माते दीपिकाची प्रसूती रजा पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करण्यास तयार होते. पण आता पहिल्या चित्रपटाच्या वाढत्या यशामुळे आणि सिक्वेलची वाढती मागणी पाहता, निर्माते दुसऱ्या भागात दीपिकाच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्याचा निर्णय घेऊ शकतात. त्यांना काहीही करून या चित्रपटाचा दुसरा भाग पूर्ण करायचा आहे.' हे ऐकून दीपिकाचे आणि चित्रपटाचे चाहतेही नाराज झाले आहेत. आता दीपिका खरंच या चित्रपटाचा भाग असणार की नाही हे येत्या काही दिवसात कळेलच.

deepika padukone
Anant Radhika Wedding: भस्म, दुधाचा अभिषेक अन्... अंबानींच्या शिवशक्ती पूजेचा व्हिडिओ पाहून नेटकरी भारावले, म्हणतात- उगीच नाही देव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.