'धर्मवीर २' चा ओटीटीवर बोलबाला! मोडला परेश मोकाशींच्या 'वाळवी'चा रेकॉर्ड, एका आठवड्यात मिळाले तब्बल इतके विव्ह्यू

Dharmaveer 2 Ott Release Break Record Of Vaalvi Movie: चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये देशभरात प्रदर्शित करण्यात आला. बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर "धर्मवीर २" हा चित्रपट झी5 या ओटीटीवर लाँच करण्यात आला.
dharmaveer 2 ott
dharmaveer 2 ottesakal
Updated on

साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट सांगत बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या "धर्मवीर २" या चित्रपटानं मोठा मान मिळवला आहे. झी5 या ओटीटीवर एका आठवड्यात सर्वाधिक व्ह्यूज "धर्मवीर २" या चित्रपटानं मिळवले आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसपाठोपाठ ओटीटीवरही साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट गाजत असल्याचं स्पष्ट झालंय.

झी 5 ओटीटीवर "धर्मवीर २" या चित्रपटाला एकाच आठवड्यात ५० मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. यापूर्वी वाळवी या चित्रपटाला एका आठवड्यात १४ मिलियन व्ह्यूज मिळाले होते. त्यामुळे "धर्मवीर २" चित्रपटानं वाळवी चित्रपटाला मागे टाकून नवा विक्रम नोंदवला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता ओटीटीवरही जगभरातील प्रेक्षकांनी "धर्मवीर २" या चित्रपटाला डोक्यावर घेतल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

"धर्मवीर २" या चित्रपटाची निर्मिती साहील मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओज या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई आणि उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. तर लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली आहे. प्रसाद ओक, क्षितीश दाते, स्नेहल तरडे, देवेंद्र गायकवाड, समीर धर्माधिकारी, हृषिकेश जोशी, आनंद इंगळे, कमलेश सातपुते, मंगेश देसाई अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये देशभरात प्रदर्शित करण्यात आला. बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर "धर्मवीर २" हा चित्रपट झी5 या ओटीटीवर लाँच करण्यात आला.

dharmaveer 2 ott
'फुलवंती'नंतर आराम करायला स्वतःच्या फार्महाउसवर पोहोचली प्राजक्ता माळी; नजारा पाहून नेटकरी म्हणाले- वाह...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.