Dharmendra: दारूच्या नशेत धर्मेंद्र यांनी ओलांडलेल्या मर्यादा, अंगाला स्पर्श करताच अभिनेत्रीने लगावली कानशिलात, नंतर...

Dharmendra Throwback Story: लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र आणि लोकप्रिय अभिनेत्री तनुजा यांच्यामध्ये घडलेली ती घटना कायमच चाहत्यांमध्ये चर्चिली जाते.
dharmendra
dharmendra esakal
Updated on

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं मात्र त्यांच्या चित्रपटांसोबतच ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चाहत्यांमध्ये चर्चेत राहिले. त्यांचे अनेक किस्से चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. त्यांचं दुसरं लग्न असो किंवा धर्म बदलणं असो, इथे काहीच लपून राहिलेलं नाही. त्यांचा असाच एक किस्सा चाहत्यांमध्ये व्हायरल आहे जेव्हा अभिनेत्री तनुजा म्हणजेच काजोलची आई यांनी धर्मेंद्र यांना कानशिलात लगावली होती. एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान असं काही घडलेलं ज्यामुळे तनुजा यांनी धर्मेंद्र यांना थोबाडीत लगावली आणि धर्मेंद्र यांच्यावर लाजेने खजील व्हायची वेळ आली.

असं काय घडलं होतं?

या किस्सा तनुजा यांनी 'फिल्मफेअर' ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता. धर्मेंद्र आणि तनुजा हे खूप चांगले मित्र होते. ते 'चांद आणि सुरज' या चित्रपटाचं शूटिंग करत होते. धर्मेंद्र यांचं लग्न झालं होतं आणि प्रकाश कौर त्यांची पत्नी होती. धर्मेंद्र यांनी तनुजा यांची पत्नीशी ओळखही करून दिली होती. मुलगा सनी देओल ५ वर्षाचा होता तरीही ते तनुजासोबत फ्लर्ट करत होते. त्यादिवशी ते दोघे एकत्र बसून दारू पित होते. मात्र नशेत धर्मेंद्र तनुजाच्या जवळ जाऊन स्पर्श करू लागले. हे पाहून तनुजा प्रचंड भडकल्या. त्यांनी रागात अभिनेत्याच्या जोरदार कानशिलात लगावली आणि अभिनेत्याला निर्लज्ज म्हटलं.

तनुजा म्हणाल्या, 'एकेदिवशी धर्मेंद्रने माझ्यासोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला मोठा धक्का बसला होता. मी त्याला थोबाडीत मारली होती. आणि म्हंटलेलं, निर्लज्ज मी तुझ्या बायकोला ओळखते तरीही तुझी इतकी हिम्मत की तू माझ्यासोबत फ्लर्ट करतोयस.' हे ऐकून धर्मेद्र खजील झाले. त्यांनी अभिनेत्रीची माफी मागितली होती. आपला भाऊ म्हणून स्वीकार कर अशी अभिनेत्रीला विनंती केली. सुरुवातीला तनुजा यासाठी मुळीच तयार नव्हत्या. मात्र धर्मेंद्र यांच्या खूप विनवणी नंतर शेवटी त्यांनी धर्मेंद्र यांच्या हातात धागा बांधून त्यांना भाऊ बनवलं होतं. तनुजा आणि धर्मेंद्र यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. तनुजा वयाच्या ७व्या वर्षी सिनेसृष्टीत आल्या तर धर्मेंद्र नंतर आले. काही वर्षांनी धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी विवाह केला. आज तनुजा आणि धर्मेद्र दोघेही चांगले मित्र आहेत.

dharmendra
Bigg Boss Marathi 5: रितेश देशमुखचं सूत्रसंचालन प्रेक्षकांना आवडलं का? वाचा जनतेचा कौल, आधी नावं ठेवली, आता...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.