२०२४ संपायला आता शेवटचे २ महिने उरले आहेत. त्यात या वर्षी मराठी सिनेसृष्टीने अनेक नवीन चित्रपट प्रदर्शित केले. यावर्षी तब्बल ५० हुन अधिक चित्रपट आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत. त्यात नवरा माझा नवसाचा २, धर्मवीर २, ओले आले, 'शिवबाचा छावा, अल्याड पल्याड, सत्यशोधक, अलीबाबा आणि चाळिशीतले चोर, खुर्ची, सापळा, मुसाफिरा, सूर लागू दे, श्रीदेवी प्रसन्न अशा अनेक चित्रपटांची नावं आहेत. मात्र या चित्रपटांपैकी आतापर्यंतचे टॉप ५ चित्रपट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात पाहिले नसतील तरी ते आता ओटीटीवर उपलब्ध आहेत. एक चित्रपट तर अजूनही चित्रपटगृहात धुमाकूळ घालतोय.
भूषण प्रधान आणि निकिता दत्ता यांचा 'घरत गणपती' हा चित्रपट २६ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. भारतीय नातेसंबंधांची गोष्ट सांगत सणांचं महत्व पाठवूक देणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. मात्र हा चित्रपट प्रत्येक मराठी प्रेक्षकांनी एकदा तरी पाहायलाच हवा. हा चित्रपट प्राइम व्हिडिओ वर उपलब्ध आहे.
महेश मांजरेकर, भूषण प्रधान यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट एका वडिलांची आपल्याच मुलाविरुद्धची लढाई दाखवतो. हा चित्रपट देखील प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे.
लोकप्रिय गायक सुधीर फडके यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट १६ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. सुनील बर्वे यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
लोकप्रिय मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांचा 'नाच गं घुमा'; प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. हा चित्रपटदेखील प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे.
प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांचा 'फुलवंती' हा चित्रपट देखील या वर्षीच्या उत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक पर्वणी आहे. प्राजक्ताचा महत्वकांक्षी चित्रपट 'फुलवंती' सध्या चित्रपटगृहात सुरू आहे. तुम्ही चित्रपटगृहात हा चित्रपट पाहू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.