रे माझ्या बापा शिवराया.... छत्रपतींची मूर्ती कोसळल्यावर दिग्पाल लांजेकरांची डोळ्यात अंजन टाकणारी पोस्ट

Digpal Lanjekar On Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आता दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी एक पोस्ट केली आहे.
digpal lanjekar
digpal lanjekaresakal
Updated on

४ दिवसांपूर्वी मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ६ महिन्यात कोसळला. या घटनेने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचे असे तुकडे पाहणं प्रत्येक शिवभक्तासाठी काळजावर वार झेलण्यासमान होतं. या घटनेचे तीव्र प्रतिसाद उमटले. तमाम शिवभक्त हळहळले. शिवप्रेमींनी या घटनेचा निषेध केला. सर्वसामान्य प्रेक्षकांसह कलासृष्टीतील कलाकारांनीही यावर प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला. आता दिग्दर्शक अभिनेते दिग्पाल लांजेकर यांनीही या घटनेवर डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट शेअर केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारलेल्या शिवराज अष्टकाची निर्मिती करणारे लोकप्रिय दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे स्वतः शिवभक्त आहेत. ते कायम शिवरायांचे विचार जनमानसात रुजवण्यासाठी प्रयत्न करत असतात. आता या प्रकरणी त्यांनी एक भावुक कविता शेअर केली आहे. छत्रपतींचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिलं, 'क्षमा धनी...

गलबलला दर्या,

त्याचे अश्रू कुणा दिसेना

बाप कोसळता माझा,

वेदना उरी ती मावेना

चूक कुणाची कुणाची,

सारे भांडती भांडती

पण भाव स्वराज्याचा,

बघा सारेच सांडती

रे माझ्या बापा शिवराया

तुमच्यासाठी उरे काया

नको मूर्ती ती लौकिक

नको स्मारक भौतिक

देवा शक्ती द्या लेकरा

तव कवतिक सांगाया

तव पराक्रमाचा तो

दीप लागू दे तेवाया

श्वास माझा हो संपू दे

तुमची स्मृती ती कोराया

मनामनाच्या अंतरी

तुमची मूर्ती साकाराया.'

त्यांची ही कविता वाचून नेटकऱ्यांनी भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही कविता वाचून त्यांचेही डोळे पाणावले आहेत. दिग्पाल लांजेकर यांनी महाराजांच्या पराक्रमावर आधारीत 'पावनखिंड', 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'सुभेदार', 'शेर शिवराज' अशा सिनेमांची निर्मिती केलीय. दिग्पाल यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमांना प्रेक्षकांचं आणि शिवप्रेमींचं प्रेम मिळालंंय.

digpal lanjekar
'तुंबाड' ते 'रहना है तेरे दिल मे'; थिएटरमध्ये का प्रदर्शित होतायत जुने चित्रपट? हे आहे कारण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.