दिलीप कुमार आणि सायरा बानो यांनी १९६६ मध्ये विवाहगाठ बांधली. त्यावेळी सायरा बानू २२ वर्षाच्या होत्या तर दिलीप कुमार ४४ वर्षांचे होते. त्यांचं लग्न हा मीडियामध्ये चर्चेचा विषय बनला. मात्र जेव्हा १९८२ मध्ये दिलीप यांनी अस्मा रहमान हिच्याशी विवाह केला तेव्हा सिनेवर्तुळात आणि चाहत्यांमध्ये वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या. सायरा बानू आई होऊ शकत नाही म्हणून दिलीप कुमार यांनी दुसरं लग्न केल्याचं बोललं गेलं. मात्र त्यानंतर अभिनेत्याने स्वतः स्पष्टीकरण देत आपल्या पत्नीची बाजू घेतली होती. सायरा बानू गर्भवती होत्या मात्र जन्माच्या आधीच आम्ही आमच्या बाळाला गमावलं असं ते म्हणाले होते.
त्यांची आत्मकथा दिलीप कुमार: द सब्सटेंस एंड द शैडो या पुस्तकात त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील असे काही किस्से सांगितले ज्याबद्दल फार कमी जणांना ठाऊक असेल. या पुस्तकात त्यांनी लिहिलं, 'जेव्हा मी अस्माशी लग्न केलं तेव्हा सायराला अत्यंत चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं की ती आई होऊ शकत नाही म्हणून मी हा निर्णय घेतला. पण तसं नाहीये. १९७२ मध्ये जेव्हा आम्ही आमच्या बाळाची आतुरतेने वाट पाहत होतो तेव्हा सायरा गरोदर होती. तो एक मुलगा होता. पण गरोदर असताना आठव्या महिन्यातच सायराला उच्च रक्तदाबाचा त्रास झाला. त्याचा उपचार करणारे प्रसूती तज्ञ पूर्ण विकसित झालेल्या आमच्या बाळाला वाचवण्यासाठी वेळेवर सर्जरी करण्यासाठी येऊ शकले नाहीत. गर्भात नाळेने श्वास अडकण्याने त्याचा मृत्यू झाला. आम्ही या गोष्टीला देवाची इच्छा म्हणत मान्य केलं.'
दिलीप कुमार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात मूल नसण्याला आयुष्यातली कमी म्हटलं आहे. आपल्या आयुष्यात मुलं असती तर हे जीवन अगदी वेगळं असतं असं ते म्हणाले आहेत. आपल्याला आपल्या पुतण्याची, भाच्यांची नेहमीच आठवण येते असं ते एका मुलाखतीत देखील म्हणाले होते. दिलीप कुमार यांनी ७ जुलै २०२१ रोजी या ज़गाचा निरोप घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.