बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया हिने वयाच्या १४ व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तिचा 'बॉबी' चित्रपट प्रचंड गाजला. हा चित्रपट आजही प्रेक्षकांचा आवडता आहे. तर डिंपल आजही 'बॉबी'साठी ओळखल्या जातात. राज कपूर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड केले होते. बॉबीमधील तिच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं. मात्र अभिनेते राजेश खन्ना यांच्याशी लग्नानंतर तिने बॉलीवूडला रामराम ठोकला होता. आता दिलेल्या एका मुलाखतीत डिंपल यांनी त्यांच्या लहानपणीच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. सिनेसृष्टीत येण्यापूर्वी त्यांना कुष्ठरोगाची लागण झाली होती असा खुलासा त्यांनी केला.
डिंपल यांनी नुकतीच FICCI FLO Jaipur Chapter ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्या म्हणाल्या, 'मला १२ व्या वर्षी कुष्ठरोग झाला होता. नंतर तो बराही झाला. मात्र त्यावेळी मी थोडीफार घाबरले होते. मला माझ्या एका मित्राने सांगितलं की तुला आता शाळेतून काढून टाकतील. मी त्यावेळी फक्त १२ वर्षांची होते. त्या म्हणाल्या माझे वडील चुन्नीभाई कपाडिया हे चित्रपट व्यवसायातील अनेक लोकांना ओळख होते. त्यावेळचा एक प्रसिद्ध दिग्दर्शक हा त्यांच्या सख्ख्या मित्रारखा होता. त्याने मला काहीतरी अपशब्द ऐकवले. मला कुष्ठरोग झाला होता आणि त्याची खूण माझ्या कोपरावर होती. तुझ्यावर बहिष्कार घातला जाईल हे मला माहीत आहे असं तो मला म्हणाला. त्यावेळी मी बहिष्कार हा शब्दच पहिल्यांदा ऐकला, बहिष्कार म्हणजे काय? ते पण मला माहीत नव्हतं.'
पण त्यानंतर डिंपलने बॉबीसाठी ऑडिशन दिली. सुरुवातीला एका लूक टेस्टमध्ये ती रिजेक्ट झाली होती. मात्र काही काळाने तिला राज कपूर यांनी परत बोलवलं. आणि शेवटी डिंपल त्यांची अभिनेत्री झाली. हा चित्रपट त्यांच्या करिअरमधला हा एकमेव दमदार आणि हिट चित्रपट ठरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.