Divya Bharti: तिचा मृत्यू झाला तेव्हा... दिव्या भारतीसोबत 'ते' शेवटचं बोलणं; अभिनेत्री सोनम खानने सांगितली आठवण

Sonam Khan On Divya Bharti Last Conversation: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री दिव्या भारती आणि अभिनेत्री सोनम खान या दोघी खूप जवळच्या मैत्रिणी होत्या.
divya bharati sonam khan
divya bharati sonam khanesakal
Updated on

Divya Bharti Death: दिव्या भारती हे नाव घेतलं की आजही अनेकांच्या डोळ्यासमोर उभे राहतात ते तिचे हिट चित्रपट आणि अपघाती निधन. दिव्या ८०च्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री ठरलेली. तिच्या सौंदर्याचे सगळे दिवाने होते. तिच्यासोबत काम करण्यासाठी दिग्दर्शक निर्माते लाइन लावून उभे असत. मात्र त्या रात्रीने सगळं काही बदललं. तिचा अकाली मृत्यू झाला आणि सगळ्यांना मोठा धक्का बसला. आता तिची जवळची मैत्रीण सोनम खान हिने तिच्या शेवटच्या आठवणीबद्दल सांगितलं आहे. मृत्यूच्या काही दिवस आधी दिव्याने सोनमला फोन केला होता.

सोनमने नुकतीच बॉलिवूड बबलला मुलाखत दिली. या मुलाखतीत दिव्या बद्दल बोलताना सोनम म्हणाली, 'दिव्याच्या अकाली जाण्याने सिने इंडस्ट्रीत मोठी पोकळी निर्माण झाली. ती खूप छान मुलगी होती. ती आज जिवंत असती तर आघाडीची अभिनेत्री असतील. तिच्याबरोबर जो दुर्दैवी अपघात घडला, तो घडायला नको होता, पण आता आपण काय करू शकतो. मी ज्यांच्याशी लग्न केलं होतं, त्या राजीव राय यांनी दिव्याला ‘मोहरा’साठी साइन केलं होतं. या चित्रपटाचं बरंचसं शूटिंग झालं होतं. तिचा मृत्यू झाला तेव्हा मी गरोदर होते. मी चुकत नसेल तर कदाचित तिचं निधन एप्रिल महिन्यात झालं आणि माझ्या मुलाचा जन्म मे मध्ये झाला. तिच्या मृत्यूच्या काही दिवस आधी मी तिच्याशी शेवटचं बोलले होते.'

ती पुढे म्हणाली, 'ती मला चंद्राकडे बघायला सांगायची. तुझं बाळ तुझ्यासारखंच सुंदर असेल असं म्हणायची. ९० च्या दशकात दोन अभिनेत्रींची मैत्री खूप दुर्मिळ होती पण आम्ही मैत्रिणी होतो. ती एकमेव अभिनेत्री होती जिच्याशी माझं खूप चांगलं नातं होतं. ती आता जिथेही असेल तिथे आनंदी असेल अशी मी आशा करते.'

divya bharati sonam khan
Chhava Teaser Out: शिवा गेला पण... 'छावा'चा जबरदस्त टीझर प्रदर्शित,पाहून अंगावर येईल काटा, नेटकरी म्हणतात-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.