अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकत्र केलेला शेवटचा सिनेमा कोणता? बॉक्स ऑफिसवर ठरलेला सुपरहिट

Marathi Movie Throwback: मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेते असलेले अशोक सराफ, सचिन आणि लक्ष्मीकांत यांचा शेवटचा सिनेमा कोणता होता तुम्हाला ठाऊक आहे का?
ashok saraf sachin pilgaonkar and laxmikant berde
ashok saraf sachin pilgaonkar and laxmikant berde esakal
Updated on

लोकप्रिय मराठी अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे कलाकार ९० च्या दशकातील प्रचंड गाजलेले कलाकार आहेत. त्यांनी स्वतःचा असा एक काळ पाहिला. या कलाकारांनी प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणलं. बुडणाऱ्या मराठी सिनेसृष्टीला एक नवीन बळ दिलं. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी जवळपास सगळ्याच कलाकारांसोबत काम केलं होतं. त्यांनी सचिन, अशोक, महेश कोठारे अशा सगळ्याच बड्या कलाकारांसोबत काम केलं. या चौकडीमधील इतर तीनही कलाकार अजून प्रेक्षकांना नवनव्या चित्रपटांमध्ये दिसत आहेत मात्र लक्ष्मीकांत यांनी लवकरच या जगाचा निरोप घेतला. मात्र लक्ष्मीकांत यांचा अशोक आणि सचिन यांच्यासोबतचा शेवटचा सिनेमा कोणता होता हे तुम्हाला ठाऊक आहे का?

महेश आणि लक्ष्मीकांत यांची जोडी तर प्रेक्षकांची प्रचंड लाडकी होती. या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यांनी 'धडाकेबाज, 'धुमधडाका', 'थरथराट' अशा अनेक चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं. तर लक्ष्मीकांत यांनी अशोक सराफ आणि सचिन यांच्यासोबतच 'बनवाबनवी'सारखा सुपरहिट चित्रपट दिला. मात्र 'आयत्या घरात घरोबा' हा चित्रपट या त्रिकुटाचा शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने धुमाकूळ घातला होता. मात्र या चित्रपटानंतर ते तिघे कधीही एकत्र काम करू शकले नाही. त्यामागे लक्ष्मीकांत यांचं आजारपण कारणीभूत ठरलं.

'आयत्या घरात घरोबा'नंतर तब्बल १४ वर्षांनी हे तिघे 'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटात एकत्र दिसणार होते. या चित्रपटात लक्ष्मीकांत बाबू कालियाची भूमिका करणार होते. मात्र तेव्हा ते खूप आजारी पडले. चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असतानाच त्यांचं निधन झालं. त्यामुळे 'आयत्या घरात घरोबा' हा चित्रपट या त्रिकुटाचा शेवटचा चित्रपट ठरला.

ashok saraf sachin pilgaonkar and laxmikant berde
Bigg Boss Marathi: मला इथे नाही राहायचं! रडतच अभिनेत्रीने व्यक्त केली घरातून बाहेर जाण्याची इच्छा, रितेशने काय निर्णय घेतला?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.