Samantha Divorce: का झालेला सामंथा आणि नागा चैतन्य यांचा घटस्फोट? कुटुंबाचा तो निर्णय ठरलेला मोठं कारण

Samantha Naga Chaitanya Divorce Reason: लोकप्रिय अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाची अनेक कारणं सांगितली जातात.
samatha and naga chaitanya
samatha and naga chaitanya esakal
Updated on

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य याने ८ ऑगस्ट २०२४ रोजी अभिनेत्री शोभिता धूलिपाला हिच्याशी साखरपुडा केला. त्यांनी अक्किनेनी यांच्या राहत्या घरी हा कार्यक्रम केला. अभिनेते नागार्जुन यांनी मुलाच्या दुसऱ्या साखरपुड्याचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले. मात्र त्यानंतर सोशल मीडियावर सामंथाच्या नावाची एकच लाट आली. अनेकांनी नागा चैतन्य याला ट्रोल केलं. हिरा सोडून चांदीच्या मागे लागला असं म्हणत त्याची खिल्ली उडाली. मात्र जेव्हा सामंथा आणि नागा चैतन्य यांनी त्यांच्या घटस्फोटाबद्दल सांगितलं होतं तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. नेमकं काय होतं त्यांच्या घटस्फोटाचं कारण?

सामंथाच्या बोल्ड भूमिका

सामंथा आणि नागा चैतन्य यांनी २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नाच्या चार वर्षात ते वेगळे झाले. त्यांनी आपल्या घटस्फोटाचं कारण सांगितलं नसलं तरी चाहते हे ऐकून शॉक झाले होते. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाबद्दल अनेक अंदाज लावले गेले. त्यातील सगळ्यात मोठं कारण हे सामंथाचे चित्रपट सांगण्यात आलं. सामंथाच्या बोल्ड भूमिकांवर नागा चैतन्यचा आणि कुटुंबियांचा आक्षेप होता. एका मुलाखतीत बोलताना अभिनेता म्हणालेला, मी अशा कोणत्याही भूमिका करणार नाही ज्यामुळे माझ्या घरातल्यांना फरक पडेल. असं म्हणत त्याने सामंथाला टोला लगावला होता. यासोबतच सामंथाचा अक्किनेनींच्या व्यवसायातील वाढता सहभाग देखील एक कारण असल्याचं सांगितलं जातं.

तर घटस्फोटानंतर काही महिन्यातच अभिनेता अभिनेत्री शोभितासोबत वेळ घालवताना दिसला. त्यावरून चाहत्यांनी नागा चैतन्यने सामंथाची फसवणूक केली असल्याचं देखील बोललं गेलं. अखेर आता नागा चैतन्य तिच्यासोबत विवाहबद्ध होण्यास सज्ज आहे. त्यामुळे त्या अफवा खऱ्या होत्या असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे सामंथा अजूनही काही गंभीर आजाराशी लढा देते आहे.

samatha and naga chaitanya
Bharat Jadhav: काही दिवसांपूर्वी इथेच... केशव भोसले नाट्यगृहातील अग्नितांडव पाहून भरत जाधव भावुक; फोटो शेअर करत म्हणाले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.