कोलकाता येथे लोकप्रिय अभिनेत्रीवर हल्ला; भेदरलेल्या अवस्थेत व्हिडीओ केला शेअर; म्हणते- हेच जर...

Actress Attacked In Kolkata: अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत घडलेली संपूर्ण घटना सांगितली आहे. यात ती प्रचंड घाबरलेली दिसत आहे.
payel mukherjee
payel mukherjee esakal
Updated on

कोलकाता येथे डॉक्टरसोबत घडलेल्या भयंकर घटनेतून अजूनही देश सावरलेला नाहीये. त्यात कोलकातामधून आणखी एक घटना समोर येतेय. एका लोकप्रिय बंगाली अभिनेत्रीच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अभिनेत्रीने रडत एक व्हिडिओ शेअर करत याबद्दल माहिती दिली. एका बाईक चालवणाऱ्या व्यक्तीने तिच्या गाडीवर हल्ला केला. नेमकं काय घडलं हे तिने व्हिडिओमध्ये सांगितलंय.

पायलसोबत नेमकं काय घडलं?

पायल काळ रात्री म्हणजे २३ ऑगस्ट रोजी गर्दीच्या ठिकाणी गेली होती. तिथे तिच्या गाडीचा आणि दुचाकीस्वाराचा छोटा अपघात झाला. त्याच्या गाडीला किंवा त्या व्यक्तीला कुठेही नुकसान आणि दुखापत झाली नाही. मात्र त्यानंतर त्या माणसाने पायलला गाडीतून बाहेर येण्यास सांगितलं. ती गाडीतून बाहेर आली नाही म्हणून त्याने गाडीची काच फोडली ज्यामुळे अभिनेत्रीला दुखापत झाली. तिने व्हिडिओ शेअर हा घटनाक्रम सांगितलं आणि म्हणाली, 'क्राइम सीनवरुन पहिला लाइव्ह व्हिडिओ. आपण कुठे राहतोय? जर एका महिलेला रात्रीच्या वेळी गर्दीच्या ठिकाणीही अशा प्रकारे त्रास दिला जात असेल आणि तिच्यासोबत गैरवर्तन केलं जात असेल तर हे चिंताजनक आहे.'

ती पुढे म्हणाली, 'एकीकडे कोलकातामध्ये महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर रॅली काढण्यात येत आहेत दुसरीकडे हे उदाहरण आहे. हेच जर माझ्यासोबत सुनसान ठिकाणी झालं असतं तर मी काय केलं असतं हा विचार करुनच मला भीती वाटत आहे.' तिच्या व्हिडिओवर पोलिसांनी प्रतिक्रिया देत या घटनेवर ताबडतोब कारवाई करण्यात आली असून त्या आरोपीला ताब्यात घेतलं असल्याचं सांगितलं. मात्र असं असलं तरी जनतेमध्ये कायदयाची भीती नसल्याचं दिसून येतं.

payel mukherjee
Stree 2 Box Office: श्रद्धाच्या 'स्त्री २'ची घौडदौड सुरूच! मोडला 'पठाण'चा रेकॉर्ड, एकूण किती केली कमाई?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.