Bigg Boss Marathi ५: घरात येताच संग्रामने एकाला दिली फुल्ल ऑन धमकी; नेटकरी म्हणाले- अर्रर्रर्र आता तर...

Sangram Chougule Entry In Bigg Boss Marathi 5: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' मध्ये आता वाइल्ड कार्ड एंट्री झाली आहे.
sangram chaugule
sangram chaugule esakal
Updated on

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक ठरलेला 'बिग बॉस मराठी ५' मध्ये नवनवे ट्विस्ट येत आहेत. मेकर्स या कार्यक्रमाला टॉप १० मध्ये आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. सुरुवातीपासूनच हा सीझन प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. या सीझनमध्ये निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेदार, अभिजीत सावंत, पॅडी, वर्षा उसगावकर, अंकिता या सदस्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मात्र आता या सगळ्यांच्या याच स्थानाला धक्का देण्यासाठी घरात एका सदस्याची वाइल्ड कार्ड एंट्री झाली आहे. त्यात घरात येताच त्याने एका सदस्याला फुल ऑन धमकीच दिली आहे. कलर्स मराठीचा हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

घरात संग्राम चौगुले याची जोरदार एंट्री झाली आहे. या एंट्रीनेच सगळे खुश झालेत. घरातील सदस्य एका वाइल्ड कार्डची वाट पाहत होते असं या प्रोमोवरून दिसतंय. कलर्सने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये संग्राम घरत येताच छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा देताना दिसतोय. त्याची ही घोषणा ऐकून नेटकरी चांगलेच खुश झाले आहेत. कोल्हापूरच्या मातीतला हा गडी सगळ्यांनाच चांगलाच भावला आहे. तर घरात येताच त्याने थेट एकाला धमकी दिली आहे. हा सदस्य दुसरा तिसरा कुणी नसून अरबाज पटेल आहे. प्रोमोमध्ये संग्राम अरबाजला म्हणतो, तू आजपर्यंत तुझी ताकद ही तुझ्यापेक्षा कमी ताकद असलेल्या व्यक्तींवर वापरली आहेस. आता तुला टक्कर देणारं कुणीतरी आलंय.

संग्रामच्या येण्याने घरातली समीकरणं बदलणार आहेत हे मात्र नक्की. त्यामुळे आता पुन्हा घरात दोन गट पडणार का हे पाहावं लागेल. त्यात संग्रामच्या येण्याने घरातल्यांसोबतच नेटकरीही खुश झाले आहेत. एकाने प्रतिक्रिया देत लिहिलं, 'एंट्री पण कडक आणि घोषणा त्या हुन छान छत्रपती शिवाजी महाराज की जय.' दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, 'आता बुक्कीत टेंगुळ नाही, बुक्कीत बगदाड.' 'आली रे आली आता निक्की अरबाज ची बारी आली, कडक संग्राम दादा. एकाने लिहिलं, 'खुप खुप अपेक्षा आहेत संग्राम तुझ्याकडुन एंट्रीने मन जिंकलं आहेस. तू तुझी ताकद योग्य त्या माणसासमोर लावशील. दाखवून दे काही लोकांना आग काय असते ती शुभेच्छा.' प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

sangram chaugule
Aai Tuljabhawani: कलर्स मराठीवरील नव्या मालिकेत 'ही' अभिनेत्री दिसणार 'आई तुळजाभवानी'च्या भूमिकेत; नवा प्रोमो समोर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.