Matthew Perry Was Murdered: लोकप्रिय अमेरिकन अभिनेता मॅथ्यू पेरी याचा २०२३ च्या ऑक्टोबरमध्ये निधन झालं होतं. तो F.R.I.E.N.D.S या अमेरिकन सिटकॉममधून घराघरात लोकप्रिय झाला होता. तो त्यात 'चँडलर बिंग'ची भूमिका साकारत होता. मॅथ्यूचा मृतदेह त्याच्या घरातील बाथटबमध्ये आढळला होता. त्यावरून हा नैसर्गिक मृत्यू असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र आता या प्रकरणी नवीन धक्कादायक माहिती समोर येते आहे. त्याच्या जवळच्या लोकांनीच त्याला हत्येचा कट रचल्याची माहिती आहे. याप्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात दोन डॉक्टरांचा समावेश आहे.
अभिनेत्याचा मृतदेह २८ ऑक्टोबर २०२३ रोजी त्याच्या लॉस एन्जलिस येथील राहत्या घरात बाथटबमध्ये मिळाला होता. नशेच्या आहारी गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. मात्र आता याप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. मॅथ्यूला ड्रग्सचं व्यसन होतं. त्याच्या मित्रांनी त्याच्या याच सवयीचा गैरफायदा घेतला. याप्रकरणी मॅथ्यूचा असिस्टंट म्हणून काम पाहणाऱ्या केनेथ इवामासा आणि त्याची देखभाल करणाऱ्या डॉक्टरांचे नाव समोर आले आहे. या लोकांनी मॅथ्यूला हजारो डॉलर्सच्या केटामाइन ड्रगची विक्री केली, ज्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे या लोकांनी पैसे कमावण्यासाठी त्याला जास्तीचे ड्रग्स विकले. हा सगळा ठरवून केलेला प्लॅन होता असं पोलिसांचं म्हणणं आहे.
अमेरिकन वकील मार्टिन एस्ट्राडा यांनी सांगितलं की, या आरोपींनी पैसे कमावण्यासाठी मॅथ्यू पेरीच्या व्यसनाचा फायदा घेतला. त्यांना माहिती होती अभिनेता जे करतोय ते चुकीचे आहे, यामुळे मॅथ्यूला मोठा धोका आहे, मात्र तरीही त्यांनी ते केलं. या डॉक्टरांनीच त्याला केटामाइन दिलेले, ज्याचा वापर साधारणत: एनेस्थिशियासाठी केला जातो. मॅथ्यू या ड्रगसाठी कितीही पैसा देण्यासाठी तयार होता. याचा फायदा घेत त्यांनी मॅथ्यूला मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचवलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.