एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Gashmeer Mahjani Talked About Gym Ethics: लोकप्रिय मराठी अभिनेता गश्मीर महाजनी याने जिम करणाऱ्या तरुणांना मोलाचा सल्ला दिला आहे. त्याने आपला अनुभवही सांगितला आहे.
gashmer mahajani
gashmer mahajani esakal
Updated on

मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनी याने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याने मराठीसोबतच हिंदी मालिका आणि वेबसीरिजमध्येही आपला ठसा उमटवला. गश्मीर नुकताच प्राजक्ता माळी सोबत 'फुलवंती' या चित्रपटात झळकला आहे. हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. अशातच त्यांची एक मुलाखत व्हायरल होतेय ज्यात गश्मीर आणि प्राजक्ता दोघेही त्यांचं फिट राहण्याचं रुटीन सांगताना दिसत आहेत. तर गश्मीर त्याचा अनुभव सांगत आजच्या तरुणांना एक मोलाचा सल्ला देतानाही दिसतोय.

गश्मीर आणि प्राजक्ता यांनी नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत गश्मीर म्हणतो, 'सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्वास हा सगळ्यात महत्वाचा असतो. तुम्ही कधीही जिममध्ये गेलात ना तर असे लालबुंद, झालेले, अपचन झाल्यासारखा चेहरा करून वजन उचलणारे तरुण तुम्हाला दिसतात. असे जे करतात ना ती फार भयंकर गोष्ट आहे. तुम्ही कित्येक उदाहरणं पाहिली असतील की ४० - ४५ वर्षाचे लोक जिममध्ये हार्ट फेल होऊन पडतात. सगळयात महत्वाचा असतो श्वास. श्वासावरचं नियंत्रण खूप गरजेचं आहे. जिमचा व्यायाम करणाऱ्या लोकांबद्दल मला इतकं वाईट वाटतं. टार्गेट असतं ५० किलो आणि तो उचलतो किती ६० आणि ८० किलो. ते करताना त्याला झेपतही नसतं.'

गश्मीर पुढे म्हणाला, 'मी १७- १८ वर्षाचा असताना हे सगळे प्रयोग केले होते कारण मला चुकीचा इन्स्ट्रक्टर मिळाला होता. मी गेल्या १५ वर्षात २५ किलोच्या वरती वजन उचललं नाही. मी माझं शरीर खूप फ़ुगवूही शकतो आणि शिडशिडीतही करू शकतो फक्त २५ किलो उचलून. त्यापलीकडे माणसाला गरजच नसते. त्यानंतर जर शरीराला जास्त त्रास दिला तर सांधेदुखी सुरू होते, ते सगळे लांगडायला लागतात, त्यांची पोटं सुटतात. केसगळती सुरू होते. पण ज्यांचं प्रोफेशन असतं ते त्यामुळे त्यांना करावं लागतं आपण नाही करायचं ते.'

गश्मीर म्हणाला, 'तिसरी गोष्ट म्हणजे ४ ते ४. ३० ची ब्रह्मवेळ असते. वैज्ञानिकरित्या तुमच्या शरीरात नवीन सेल तयार होत असतात. माझं तरुण पिढीला आवाहन आहे की ज्या वेळेला तुम्ही झोपताय त्या वेळेला उठायला सुरुवात करा. मी सातही दिवस नाही करत पण किमान सहा दिवस मी उठतो आणि सातव्या दिवशी मी रात्री पार्टी करतो आणि उशिरा झोपतो आणि उशिरा उठतो. नाहीतर मी ४. ३० ला उठतो. ५ ते ५. ३० पर्यंत माझं वाचन होतं. मी ६ ला जिमला जातो. आणि सकाळचा व्यायाम सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. तरुण पिढी तुम्हाला रात्री व्यायाम करताना दिसेल. अत्यंत वाईट वेळ व्यायामाची. करू नका. न केलेलं परवडलं. पण सकाळीच व्यायाम करणं गरजेचं आहे. सकाळचा व्यायाम खरा व्यायाम.

gashmer mahajani
'बिग बॉस संपल्यावर धाडकन आपटला कलर्स वाहिनीचा टीआरपी; 'ही' वाहिनी ठरली नंबर २, कलर्स कितव्या स्थानावर?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.