जिनिलियाने सासूबाईंबरोबर केली नवरात्रीची पूजा ! देशमुखांच्या सुनांचं होतंय कौतुक

Genelia Ghatsthapana Pooja With Mother In Law : अभिनेत्री जिनिलिया देशमुखने तिच्या सासूबाईंबरोबर नवरात्रीची पूजा करत गावातील घरात घटस्थापना केली. सोशल मीडियावर जिनिलिया आणि तिच्या सासूबाईंचं कौतुक होतंय.
Genelia Deshmukh
Genelia Deshmukhesakal
Updated on

Marathi Entertainment News : सध्या सगळीकडे नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतोय. नवरात्रीच्या नऊ रंगात संपूर्ण देश न्हाऊन गेला आहे. महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुखच्या लातूरच्या घरीही उत्साहात घटस्थापना पार पडली. रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जिनिलियाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत देशमुखांच्या घरातील घटस्थापनेची झलक शेअर केली.

Genelia Deshmukh
Bigg Boss Marathi 5 : सूरज की निक्की कोण आहे व्होटिंग ट्रेंड्समध्ये आघाडीवर ? घ्या जाणून या सीजनचे फायनल वोटिंग ट्रेंड्स

देशमुख कुटूंबात सगळे मराठमोळे सण उत्साहात साजरे केले जातात आणि जिनिलिया मूळची महाराष्ट्रातील नसूनही सगळ्या सणांमध्ये आनंदाने सहभागी होत हे सण साजरे करते. गणेशोत्सव, गुढीपाडवा ते अगदी दिवाळी पर्यंत सगळ्याच सणांमधील तिचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो.

Genelia Deshmukh
Riteish Deshmukh: "सन्नाटे में मरने से अच्छा है शोर मचाया जाए",'पिल' वेब सिरीजमधून रितेशचं वेबविश्वात पदार्पण ; ट्रेलरची होतेय चर्चा

सोशल मीडियावर इंस्टाग्राम स्टोरी या फिचरचा वापर करत जिनिलियाने देशमुखांच्या घरात झालेल्या देवीच्या घटस्थापनेची झलक शेअर केली. या व्हिडीओमध्ये रितेशच्या आई देवीची पूजा करून आरती करताना दिसत आहेत. तर देशमुख कुटूंबाचं देवघरही नवरात्रीनिमित्त खूप सुंदररित्या सजवलं आहे. जिनिलियाने या व्हिडिओला 'आईंबरोबर घटस्थापना' असं कॅप्शन दिलं आहे. याबरोबरच शेअर केलेल्या आणखी एका व्हिडिओमध्ये ती गाडीतूनच त्यांच्या गावातील मंदिरात पार पडणाऱ्या नवरात्रोत्सवाची झलक शेअर केली.

Navratri 2024
Navratri 2024Esakal

जिनिलियाने वेड सिनेमातून मराठी सिनेविश्वात अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. या आधी तिने काही मराठी सिनेमांची निर्मिती केली होती. तिचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. तर आता बऱ्याच काळाने ती बॉलिवूड सिनेमात दिसणार आहे. आमिर खानबरोबर ती 'सितारे जमीन पर' या सिनेमात काम करतेय. लवकरच तिचा हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Genelia Deshmukh
Genelia Deshmukh: "माझ्या अंगावर सरसरून काटा आला, राक्षसांना..."; कोलकाता डॉक्टर बलात्कार प्रकरणात जेनेलिया देशमुख संतापली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.