नुकत्याच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या. पुढील पाच वर्षांचं भवितव्य ठरवणाऱ्या या निवणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी समोर येणार आहे. यावेळी कित्येक कलाकारांनी प्रेक्षकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. महाराष्ट्राची स्थिती सुधारण्याची हीच संधी आहे असं सांगताना दिसले. अशातच लोकप्रिय अभिनेत्री आणि रितेश देशमुखची पत्नी जिनिलिया देशमुख हिचं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांची सून असलेली जिनिलियाने त्यांच्या घरातील मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आहे.