घराबाहेर होताच घनश्याम दरोडेने निक्की नाही तर सुरजसाठी अख्ख्या महाराष्ट्रासमोर जोडले हात; कारण...

Ghanshyam Darode Do Request For Suraj Chavan: लोकप्रिय मराठी कार्यक्रम बिग बॉस मराठी ५ मधून घनश्याम दरोडे बाहेर झाला आहे. मात्र त्याने सूरजसाठी संपूर्ण महाराष्ट्राला आवाहन केलं आहे.
ghanshyam darode
ghanshyam darode eaakal
Updated on

'बिग बॉस मराठी ५' ने सध्या संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलंय. या कार्यक्रमात खेळले जाणारे खेळ आणि घरातील सदस्यांचा गेम सगळंच प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. त्यात निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर, अरबाज पटेल, पंढरीनाथ कांबळे, वर्षा उसगावकर यांच्या खेळाकडे प्रेक्षकांची बारीक नजर आहे. मात्र या आठवड्यात घरातील एकाचा प्रवास संपला. तो होता छोटा पुढारी घनश्याम दरोडे. घनश्याम आणि निक्की यांची मैत्री त्यांचे डायलॉग सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. मात्र घराबाहेर येताच घनश्यामने सुरजसाठी सगळ्यांना आवाहन केलं आहे.

काय म्हणाला घनश्याम दरोडे

घनश्याम घराबाहेर झाल्यावर त्याची आणि निक्कीची मैत्री पाहून तो निक्कीसाठी प्रेक्षकांना विनंती करेल असं वाटत होतं. मात्र घनश्यामने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. घनश्यामने नुकतीच टीव्ही९ ला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना घनश्याम म्हणाला, 'सुरुवातीला जेव्हा पहिल्या आठवड्याचं नॉमिनेशन होतं तेव्हा सगळे म्हणत होते की सुरजला नॉमिनेट करूया. त्याला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, गेम कळत नाही मग त्याला बाहेर काढूया. पण मी म्हणालो की नाही. मला सूरजला नॉमिनेट करायचं नाही. मी किती खचता खाल्ल्यात, शेतकऱ्याचा मुलगा आहे, तो पण शेतकऱ्याचा मुलगा आहे. आई- वडील नसताना त्याने मेहनत करून एवढं कमावलं. तो स्वतःच्या ताकदीवर इथपर्यंत पोहोचला. त्यालाही एक चान्स मिळायला हवा.'

पुढे घनश्याम संपूर्ण महाराष्ट्राला आवाहन करत म्हणाला, 'आपण त्याला सपोर्ट केला पाहिजे. मला सगळ्यांना एकच आवाहन करायचं आहे, सुरज चव्हाणच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. त्याला वोट करा. तो पुढे गेला पाहिजे.' नुकतीच घरात एक वाइल्ड कार्ड एंट्री झाली आहे. संग्राम चौगुले याने घरात एंट्री केली आहे. त्यामुळे घरातली सगळी समीकरणं बदलणार आहेत हे मात्र नक्की

ghanshyam darode
Bigg Boss Marathi Season 5 मध्ये सुरज चव्हाणला का घेतलं? केदार शिंदे म्हणाले- त्याला पहिल्यांदा भेटलो तेव्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.