Entertainment News: आज १४ नोव्हेंबर म्हणजेच बालदिन. लहानपण देगा देवा असं म्हणत प्रत्येकजण आपल्यातलं लहान मूल जपून ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. प्रत्येकासाठी बालपणीच्या आठवणी खूप खास असतात. अशाच काही आठवणी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मधील मुख्य अभिनेत्री गिरीजा प्रभू हिने शेअर केल्यात. तिने तिची बालपणीची आठवण सांगितलीये ज्यात तिने उमेश कामत आणि प्रिया बापटसोबत काम केलंय. तो चित्रपट म्हणजे 'टाइम प्लीज'. या चित्रपटात गिरीजा देखील आहे. मात्र यापूर्वी कुणीही तिला ओळखू शकलेलं नाही. एका मुलाखतीत तिने तिची आठवण सांगितलीये.
गिरीजा दिसतेय तो सीन आहे जेव्हा प्रिया आणि सिद्धार्थ जाधव एकमेकांना पहिल्यांदा भेटतात. त्यांच्या बिल्डिंगच्या बाहेर ते भेटतात तेव्हा तिथे पाठीमागे काही मुलं क्रिकेट खेळताना दाखवली आहेत. त्यात एक गिरीजादेखील आहे. याबद्दल सांगताना गिरीजा म्हणाली, 'एक क्रिकेट खेळण्याचा शॉट होता. जेव्हा सिद्धार्थ दादा आणि प्रिया ताई पहिल्यांदा भेटतात तेव्हा मागे जी मुलं खेळतायत त्यात मी एकटीच मुलगी आहे. जी क्रिकेट खेळतेय. तिला क्रिकेटचं काहीही माहित नाहीये. मला सांगितलेलं इकडून तिकडे जायचं तिकडून इकडे यायचं. ओके. मला माहिती नाही डिरेक्टर कोण आहे, डीओपी कोण आहे, कॅमेरा कुठे आहे. सरांनी सांगितलं बस करायचं. आताही तो सीन पाहिला तरी हसायला येतंच.'
त्या सीनमध्ये गिरीजा मागे खेळताना दिसतेय. या सीनमध्ये ती गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय. तिने वेणी बांधली आहे. ती अतिशय गोड हसताना दिसतेय. आता हा सीन पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. आम्ही यापूर्वी कधीही हे नोटीस केलं नाही असं म्हणत नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.