बॉलिवूड अभिनेता गोविंदा याची पत्नी सुनीता अहुजा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे सुनीताने दिलेली मुलाखत. सुनीताने नुकतीच 'टाइमआऊट विथ अंकीत' या पॉडकास्टला मुलाखत दिली. यात तिने तिच्या आणि गोविंदाच्या नात्याबद्दल, त्याच्या करिअरबद्दल अनेक खुलासे केले आहेत. सोबतच तिने तिच्या मुलांबद्दलही सांगितलं आहे. याच मुलाखतीत तिने तिच्या मृत पावलेल्या मुलीबद्दलही सांगितलं आहे. गोविंदाला एक नाही तर दोन मुली होत्या मात्र जन्मल्यानंतर तिसऱ्या महिन्यातच ती मरण पावली.
सुनीताने सांगितलं की, तिने आपला मुलगा यशवर्धनला नेहमीच प्रेमाने आणि लाडाने वाढवले आहे आणि त्यामागे एक मोठं कारण आहे. ती म्हणाला, 'यशचे थोडे जास्त लाड झाले कारण तो टीनापेक्षा आठ वर्षांनी लहान आहे. यशच्या आधी मला दुसरी मुलगीही झाली, पण तिचा जन्म वेळेआधी झाला आणि ती जास्त काळ जगू शकली नाही. तिचा मृत्यू झाला तेव्हा ती तीन महिन्यांची होती. त्याच्या फुफ्फुसांचा पूर्ण विकास झाला नव्हता.
सुनीताने सांगितलं की, आपल्या मुलीच्या मृत्यूमुळे ती खूप घाबरली होती. सुनीता म्हणाली, 'म्हणूनच मी घाबरले होते म्हणून यशला सांभाळून मोठं केलं. आता मला त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या आहेत, पण ठीक आहे. तो कुटुंबातील सर्वात खोडकर आहे, मी त्या दोघांशी कठोर वागते, पण आता ते मोठे झाले आहेत. मी मुलांना शाळेत सोडायची आणि आणायची, मी माझ्या मुलांना नोकरांसोबत कधीच सोडलं नाही.'
सुनीता म्हणाली की, ती गोविंदाला 40 वर्षांपासून ओळखते. सुनीता बी.कॉमच्या शेवटच्या वर्षाला असताना अभिनेत्याची भेट झाली. 'त्यावेळी आमचे कोणतेही अफेअर नव्हते. मला ते अगदी छान वाटले. तो विरारचा आणि मी पाली हिलची. आपण प्रेमात पडू आणि लग्न करू असे कोणाला वाटले असेल? सुनीताने याच मुलाखतीत सांगितलं की, लग्नानंतर सासूने तिला छोटे कपडे घालू दिले नाहीत. तिने थेट मिनीस्कर्टवरून साडी नेसायला सुरुवात केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.