Suraj Chavan Girlfriend: यावेळेसचा 'बिग बॉस मराठी ५' गाजतोय तो काही वेगळ्याच कारणांमुळे. बिग बॉस मराठीमध्ये यावेळेस काही वेगळे चेहरे पाहायला मिळतायत. त्यात काही क्रिएटर्स आहेत तर काही अभिनेते. मात्र त्यातील क्रिएटर्स कलाकारांवर भारी पडताना दिसत आहे. त्यातलाच एक ओळखीचा चेहरा म्हणजे सुरज चव्हाण. सुरजला गेम कळला नसला तरी चाहत्यांचा त्याला प्रचंड सपोर्ट आहे. ,मात्र कायम चेहऱ्यावर हसू ठेवणाऱ्या सुरज चव्हाणच्या वैयक्तिक आयुष्यात बरंच काही घडून गेलंय. त्याने ब्रेकअपचं दुःखही पचवलं आहे. त्याने बिग बॉसच्या घरात याबद्दल सांगितलं आहे.
सुरज आणि निकी एकमेकांशी गप्पा मारताना सुरज त्याच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल सांगतो. मलाही प्रेमात धोका मिळालाय असं तो निक्कीला सांगतो. त्यावर निकी त्याला कधी असं विचारते. त्यावर सुरज म्हणतो, भेटलोय एकदा. निकी विचारते तू प्रेम केलं होतंस का तिच्यावर? तुला बुक्कीत टेंगुळ तर नाही दिलं ना? त्यावर सुरज म्हणतो, माझ्याबरोबर चांगली राहायची, चांगली बोलायची, चालायची. पण तिला दुसरा चांगला मुलगा आवडला. तो गोरा होता. लगेच गेली मला सोडून. गुलीगत धोका दिलाच ना मला. मला लय राग आलेला. तेव्हाच मी ठरवलं, स्वतःचं काहीतरी बनवणार. मग असला मोठा स्टार बनलो, लोकांच्या मनावर राज्य केलं. गुलीगत झापून झुपुक. गाणी वाजतात आपली.
त्यावर निकी विचारते कधी बोलला तिच्याशी नंतर? त्यावर सुरज म्हणतो, नाही आता नाही. सुरज तिचं नाव सुद्धा सांगत नाही. चांगलं चाललंय बिचारीचं. उलट भारी वाटतं बाबा, खुश आहे तिच्या आयुष्यात माझं पिल्लू. यावर नेटकरी मात्र सुरजचं कौतुक करत आहेत. आजकाल मुलं सोडून गेलेल्या मुलीच्या जीवावर उठतात आणि तू तिच्याबद्दल इतका चांगला विचार करतोस, मानलं तुला सूरज तुझी विचार करण्याची पद्धत आवडली, कोण म्हणलं तुला की तू अडाणी आहेस तू तर शिकलेल्यांना पण मागे टाकलंस. असं म्हणत नेटकरी त्याच्या विचारांचं कौतुक करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.