प्रतीक्षा संपली! सिद्धार्थ जाधवच्या 'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' ची रिलीज डेट समोर; या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Hajarvela Shole Pahilela Manus Release Date: 'या चित्रपटाने अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.
hajarvela shole pahilela manus
hajarvela shole pahilela manus esakal
Updated on

Siddharth Jadhav Hajarvela Shole Pahilela Manus: हिंदी चित्रपटाच्या इतिहासात 'शोले' या चित्रपटाचं स्थान अनन्यसाधारण महत्त्वाचं आहे. या चित्रपटाची आजही प्रचंड लोकप्रियता आहे. १५ ऑगस्ट १९७५ मध्ये प्रदर्शित झालेला "शोले" या चित्रपटाचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण झाले असताना 'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' हा मराठी चित्रपट अनोख्या पद्धतीने सलाम करणार आहे. नावापासूनच वेगळेपण असलेला, तगडी स्टारकास्ट आणि अनेक राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेला 'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' हा चित्रपट २९ नोव्हेंबरपासून मोठ्या पडद्यावर येत आहे.

'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' या चित्रपटाच्या नावातूनच "शोले" या गाजलेल्या चित्रपटाशी कथेचा काहीतरी संबंध आहे हे स्पष्ट होतं. चित्रपटाच्या नावामुळेच त्याच्या कथानकाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळवकर, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता दातार, मिलिंद शिंदे, किशोर कदम, बालकलाकार श्रीरंग महाजन यांच्या प्रमुख भूमिका असून अभिनेते समीर धर्माधिकारी व आनंद इंगळे हे पाहुण्या कलाकारच्या भूमिकेत आहेत.

"शोले" चित्रपटाचं थरारक कथानक, त्यातील कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे व्यक्तिरेखा अजरामर झाल्या. त्यामुळेच "शोले" चित्रपट आजही अविस्मरणीय आहे. "शोले" चित्रपटाच्या याच आठवणींना "हजारवेळा शोले पाहिलेला माणूस" हा चित्रपट सलाम करणार आहे. विश्चास मीडिया आणि एंटरटेन्मेंटचे राजेश डेम्पो, भक्ती डेम्पो आणि कॉंसमीडिया एंटरटेन्मेंटचे सगूण वाघ, श्रीदेवी शेट्टी वाघ यांनी "हजारवेळा शोले पाहिलेला माणूस" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शोले मीडिया अँड एंटरटेन्मेंट, कुबेरन्स टेक व्हेंचर्स चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

तर जीत वाघ असोसिएट प्रोड्यूसर आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हृषिकेश गुप्ते यांनी केलं आहे. अमोल गोळे यांनी छायांकन, रोहन रोहन,स्वरुप आनंद भालवणकर, वरुण लिखाते यांनी संगीत तर विनोद पाठक यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. शंकरैय्या दोराईस्वामी यांनी नृत्यदिग्दर्शन तर क्रिएटिव्ह डायरेक्टर शंकरैय्या दोराईस्वामी आणि विनोद पाठक आहेत.

hajarvela shole pahilela manus
Raj Thackeray: राज ठाकरेंवर चित्रपट येणार? तेजस्विनी पंडितच्या फोटोंमुळे चर्चांना उधाण, कोण साकारतंय भूमिका?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.