बॉलिवूड अभिनेते आलोक नाथ यांच्यावर अनेक अभिनेत्रींनी मीटू मुव्हमेंट दरम्यान आरोप केले होते. मोठ्या पडद्यावर दिसणारे हे संस्कारी बाबूजी पडद्यामागे इतके वाईट असतील असा कुणी विचारही केला नव्हता. त्यामुळे जेव्हा हे आरोप करण्यात आले तेव्हा सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. त्यानंतर ते इंडस्ट्रीमधूनच गायब झाले. ते कुठल्याही बॉलिवूड पार्टीमध्ये किंवा समारंभात दिसले नाहीत. आता त्यांच्याबद्दल अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्रीने त्यांच्या वागण्याबद्दल अशी गोष्ट सांगितली आहे जो ऐकून सगळेच चकीत झाले आहेत.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत हिमानी शिवपुरी यांनी सांगितलं की आलोक नाथ सेटवर चांगले वागत असत. पण दारू प्यायल्यानंतर ते पूर्णपणे बदलून जायचे. अभिनेत्रीने 'हम आपके है कौन'च्या शूटिंगदरम्यानचा एक प्रसंग सांगितला, जेव्हा अभिनेत्याने दारूच्या नशेत गोंधळ घातला होता.
हिमानी पुढे म्हणाल्या, 'मी त्याच्यासोबत याआधी खूप काम केलं आहे आणि त्याच्याबद्दलची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा तो दारू पीत नाही तेव्हा तो सुसंस्कृत असतो. त्याचे व्यक्तिमत्व हुबेहुब जेकिल आणि हाइडसारखे होते. एसएसडीमध्ये घडलेली एक घटना सोडली तर मला त्याच्यासोबत काम करताना कधीच अडचण आली नाही. पण मी लोकांकडून ऐकले आहे की दारू प्यायल्यानंतर ते एक वेगळे व्यक्ती बनतात.
यादरम्यान अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी एका अवॉर्ड शोची घटना सांगितली. फ्लाइटमध्ये दारू पिऊन आलोक नाथ कसे बेधुंद झाले होते. पत्नीसह अभिनेत्रीनेही त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला होता. सावध राहण्याचा इशाराही दिला होता. नाहीतर त्यांना फ्लाइटमधून बाहेर काढण्यात आलं असतं. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्याला यापूर्वीही एकदा फ्लाइटमधून बाहेर काढण्यात आलं होतं.
हिमानी शिवपुरी म्हणाल्या, 'जेव्हा आलोक जी सेटवर होते तेव्हा ते खूप शांत आणि व्यावसायिक होते. पण घड्याळात 8 वाजताच तो वेगळा माणूस झाला.' 2018-19 मध्ये MeToo चळवळीदरम्यान अनेक महिलांनी अभिनेत्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. संध्या मृदुल, नवनीत निशान आणि विनता नंदा यांसारख्या अभिनेत्रींनी त्यांच्यावर आरोप केले होते. आणि आलोक नाथ यांनी ते आरोप कधीही नाकारले नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.